scorecardresearch

जिनिलियाने फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज, म्हणाली “आज मी…”

जिनिलियाने नुकतंच तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जिनिलिया ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. जिनिलियाने नुकतंच तिच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. जिनिलिया ही लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत जोरदार कमबॅक करणार आहे. तिने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

जिनिलियाने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या आगामी चित्रपटाच्या लूकमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. यात जिनिलियाने सुंदर लेहंगा परिधान केला आहे. त्यासोबत तिने नवीन हेअरस्टाईलही केली आहे. यात जिनिलिया ही फारच गोड दिसत आहे. हे फोटो शेअर करतेवेळी तिने तिच्या चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे.

“आज मी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पुन:प्रवेश केला. ही एक जागा आहे जी घरापासून दूर असली तरी ती घराप्रमाणेच आहे. या विशेष भागासाठी माझा विचार केल्याबद्दल धन्यवाद. मी तुमचे खूप खूप आभार मानते. त्यासोबतच मी किर्ती रेड्डी यांनाही त्यांच्या पदार्पणाच्या चित्रपटाबद्दल शुभेच्छा देते. तुमच्या पहिल्या चित्रपटाचा मी एक भाग असल्याचा मला आनंद आहे”, असे कॅप्शन जिनिलियाने दिले आहे.

महाराष्ट्राची लाडकी सूनबाई म्हणून जिनिलियाला ओळखले जाते. जिनिलियाने तिच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटात काम केले आहे. मात्र लग्नानंतर तिने काही काळासाठी या सर्वातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिचे अनेक चाहते जिनिलिया पुन्हा चित्रपटात कधी दिसणार? असा प्रश्न उपस्थित करत होते. अखेर तब्बल १० वर्षांनंतर तिने मराठी चित्रपट वेड द्वारे सिनेसृष्टीत पुन्हा पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता.

माझ्या बायोपिकमध्ये ‘या’ दोन अभिनेत्यांनी साकारावी प्रमुख भूमिका, शेन वॉर्नने व्यक्त केली होती इच्छा

त्यानंतर आता जिनिलिया ही एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कर्नाटकचे माजी मंत्री आणि लोकप्रिय उद्योगपती गली जनार्दन रेड्डी यांचा मुलगा किर्ती झळकणार आहे. हा एक तेलुगु-कन्नड द्विभाषिक चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन राधाकृष्ण यांनी केले आहे. नुकतंच या चित्रपटाचे भव्य दिव्यपद्धतीने लाँचिंग करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Genelia deshmukh makes a grand return to the south after a decade share photo on instagram nrp

ताज्या बातम्या