“रितेश रावांचं नाव घेते…”, जिनिलिया वहिनींचा मराठीत दमदार उखाणा

झी मराठीने इन्स्टाग्रामवर याबाबतचा एक फोटो शेअर केला आहे.

झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ आणि त्यातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. नुकतंच या कार्यक्रमात ‘बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल’ अशी ओळख असणाऱ्या अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया यांनी हजेरी लावली. या संपूर्ण कार्यक्रमाचा एक प्रोमो नुकतंच झी मराठीने प्रदर्शित केला आहे. यात जिनिलिया चक्क मराठीत उखाणा घेताना दिसत आहे.

झी मराठीने प्रदर्शित केलेल्या या प्रोमोत रितेश आणि जिनिलिया दोघेही एकत्र बाजूबाजूला बसलेले पाहायला मिळत आहे. यावेळी सूत्रसंचालक निलेश साबळे तिला उखाणा घ्या, असे म्हणतो. त्यानंतर जिनिलियाही लाजत उखाणा घेताना दिसते.

यावेळी उखाणा घेताना जिनिलिया म्हणते, “जोडी आमची जमली, जमले ३६ गुण; रितेश रावांचं नाव घेते, देशमुखांची सून,” असा दमदार उखाणा जिनिलिया घेताना दिसत आहे. दरम्यान तिचा हा दमदार उखाणा पाहून अनेकजण अवाक् झाले आहेत.

झी मराठीने इन्स्टाग्रामवर याबाबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात रितेश, जिनिलिया आणि निलेश साबळे हे दिसत आहे. “लई भारी जोडी …! ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये ..! पहा या सोमवार ते बुधवार आपल्या थुकरटवाडीत रितेश देशमुख आणि जेनिलिया वहिनी यांची मराठमोळी धमाल…!”चला हवा येऊ द्या,” असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. दरम्यान रितेश आणि जिनिलिया या कार्यक्रमात येण्यामागचे नेमकं कारण काय आहे? हे अद्याप समोर आले नाही.

बॉलिवूडची ‘लय भारी’ जोडी झळकणार थुकरटवाडीत, रितेश-जिनिलियाचा धमाल व्हिडीओ पाहिलात का?

दरम्यान काही दिवसांपूर्वी झी मराठीने युट्यूबवर याच कार्यक्रमातील एक व्हिडीओ शेअर केला होता. यात चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील विनोदवीर रितेश देशमुखच्या लय भारी या चित्रपटातील काही सीन रिक्रेट करताना दिसत आहे. मात्र ते सीन क्रिएट करण्याची त्यांची विनोदी पद्धत पाहून रितेश आणि जिनिलिया हे दोघेही खळखळून हसताना दिसत आहेत. विशेष म्हणजे लय भारी चित्रपटातील अनेक सीन्स या विनोदवीरांनी दाखवले आहेत. तर लय भारी चित्रपटातील ‘आला होळीचा सण लय भारी’ हे गाणेही फार विनोदी पद्धतीने चित्रित केले आहे. जवळपास ९ मिनिटांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Genelia special ukhana for riteish deshmukh in chala hawa yeu dya special episode nrp