‘गिन्नी वेड्स सन्नी’ चित्रपटातील नवे गाणे प्रदर्शित

हे गाणे सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि विक्रांत मेसी यांचा ‘गिन्नी वेड्स सनी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील ‘लोल’ आणि ‘सावन में लग गई आग’ ही दोन गाणी प्रदर्शित झाली होती. ही गाणी प्रदर्शित होताच सोशल मीडियावर चर्चेत होती. आता चित्रपटातील आणखी एक गाणे प्रदर्शित झाले आहे.

आता ‘गिन्नी वेड्स सनी’ या चित्रपटामधील ‘रुबरु’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामध्ये यामी आणि विक्रांत यांची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून अनेकांना आवडले असल्याचे पाहायला मिळते.

‘गिन्नी वेड्स सनी’ हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती विनोद बच्चन यांनी केली आहे. या चित्रपटात यामी गौतम आणि विक्रांत मेसी यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असल्याचे पाहायला मिळते. हा चित्रपट ९ ऑक्टोबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटाच्या निमित्ताने यामी आणि विक्रांत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ginni weds sunny new song rubaru release avb

ताज्या बातम्या