ग्लॅमगप्पा : एक्स आणि नवरा जेव्हा एकत्र येतात..

मसक्कलीने करीनाला विचारल्यावर तिने मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवणे पसंत केले.

आपला एक्स बॉयफ्रेंड आणि नवरा समोरासमोर येतात. इतकंच नाही तर एकमेकांची स्तुतीही करतात हा क्षण अनुभवताना काय होत असेल ते बिच्चाऱ्या करीनालाच ठाऊक. तिला स्वप्नातही वाटलं नसेल की तिचा एक्स आणि नवरा एकत्र येतील. पण विशाल भारद्वाजने ही किमया करून दाखवली आणि तिला चांगलंच पेचात अडकवलं. ‘रंगून’च्या निमित्ताने शाहिद आणि सैफ एकमेकांसोबत अभिनय करण्यासाठी एकत्र आले आणि एकमेकांचे चांगले मित्रही झाले. इतकेच नव्हे तर शाहिदने सैफची खास स्तुतीही केली. सैफ किती कूल आणि मनमिळाऊ आहे. तो एक चांगला अभिनेता आहे अशी एकना अनेक स्तुतिसुमने शाहिद उधळत होता. मसक्कलीने करीनाला विचारल्यावर तिने मात्र हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवणे पसंत केले.

‘सोने पे सुहागा’

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा ही म्हण तुम्ही एकली असेलच. असंच काहीसं सध्या सिद्धार्थचं झालंय आणि त्यात फवादचा मात्र बळी गेलाय. पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आल्याने सलमान खानची निर्मिती असलेल्या नव्या चित्रपटात फवादच्या जागी सिद्धार्थची वर्णी लागली आहे. मेंटोर करण जोहरने फवादच्या जागी सिद्धार्थचं नाव सुचवल्यानं सिद्धार्थसाठी ही संधी ‘सोने पे सुहागा’ ठरणार आहे.

मसक्कली

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Glam gappa kareena kapoor sidharth malhotra