आज इंग्रजी अभिनेते ॲलन रिकमन यांचा आज जन्मदिवस आहे. यानिमित्त गूगलकडून त्यांना खास मानवंदना देण्यात आली आहे. ब्रॉडवे नाटक ‘लेस लायझन्स डेंजरस’ मधील त्यांच्या कारकिर्दीची ३६ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ॲलन यांना एक डूडल समर्पित करण्यात आले आहे.

‘हॅरी पॉटर’ या लोकप्रिय चित्रपटांमध्ये प्रोफेसर सेव्हरस स्नेपची भूमिका करणाऱ्या ॲलन यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९४६ रोजी पश्चिम लंडनमध्ये झाला. अभिनेत्याबरोबरच ॲलन रिकमन हे चित्रकारही होते. त्यांनी ग्राफिक डिझायनिंगचेही शिक्षण घेतले. १९८५ च्या लेस लायझन्स डेंजेरियस (डेंजरस लायझन्स) या नाटकात त्यांनी अँटी-हिरो ले व्हॉकोम्टे डी व्हॅलमोंट ही भूमिका साकारली. या नाटकातील त्यांची भूमिका गाजल्यानंतर त्यांना चित्रपटांमध्ये काम करण्याच्या ऑफर्स मिळू लागल्या.

prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

आणखी वाचा : हॅरी पॉटरचे लेखन करताना वापरलेल्या खुर्चीचा २.६ कोटींमध्ये लिलाव

हेही वाचा : मुकेश अंबानींच्या जिओ सिनेमावर आता हॅरी पॉटर, गेम्स ऑफ थ्रोन्ससारखे चित्रपट पाहता येणार, ‘या’ हॉलिवूड प्रॉडक्शन हाऊसशी केला करार

ॲलन रिकमन यांनी तीन नाटके आणि दोन चित्रपटांचे दिग्दर्शनही केले आणि त्यांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांना अनेक नामांकन आणि पुरस्कार मिळाले. २००१ मध्ये, जेव्हा त्यांनी हॅरी पॉटर आणि फिलॉसॉफर्स स्टोनमध्ये सेव्हरस नेपची भूमिका केली तेव्हा त्यांची लोकप्रियता आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरली. ‘हॅरी पॉटर’च्या सर्व चित्रपटांमध्ये त्यांनी ही भूमिका साकारली आणि या चित्रपटामुळे त्यांना वेगळी ओळख मिळाली.