गॉसिप

चित्रीकरण व रोजच्या धावपळीतून आलेला शिणवटा घालवण्यासाठी अलीकडेच सहारा वाहिनीवरील सर्व कलाकांरांनी अलीबाग येथे जाऊन तुफान धम्माल केली. खाओ पिओ ऐश करो असे काहीसे वातावरण तिथे होते. अलिबागच्या नितांतसुंदर समुद्रकाठी असगॉसिपलेल्या त्या रिसॉर्टमध्ये सहारातील सर्व कलाकारांनी जीवाची मुंबई नव्हे अलीबाग केली. यामध्ये बाल हनुमानाची भूमिका करणारा राज भानुषाली पासून ते थेट पंकज तिवारी, सचिन श्रॉफ, रेशमी घोष आदी सर्व कलाकार सहभागी झाले होते.

हमे भी ऐसा ‘सहारा’ चाहिए
चित्रीकरण व रोजच्या धावपळीतून आलेला शिणवटा घालवण्यासाठी अलीकडेच सहारा वाहिनीवरील सर्व कलाकांरांनी अलीबाग येथे जाऊन तुफान धम्माल केली. खाओ  पिओ ऐश करो असे काहीसे वातावरण तिथे होते. अलिबागच्या नितांतसुंदर समुद्रकाठी असलेल्या त्या रिसॉर्टमध्ये सहारातील सर्व कलाकारांनी जीवाची मुंबई नव्हे अलीबाग केली. यामध्ये बाल हनुमानाची भूमिका करणारा राज भानुषाली पासून ते थेट पंकज तिवारी, सचिन श्रॉफ, रेशमी घोष आदी सर्व कलाकार सहभागी झाले होते. आज तोंडाला रंग फासून कॅमेऱ्यासमोर येऊन उभे राहायचे नाही त्यामुळे कुछ भी करो असा काहीसा सर्वाचा अविर्भाव होता. सहाराने या सर्व कलाकारांच्या खाण्यापिण्याची चोख व्यवस्था केली होती. त्यामुळे अनेकांनी त्याचा मनसोक्तपणे फायदा उठविला. काहीजण तर तासनतास स्विमिंगपूलमध्ये डुंबून होते. अर्थात एक दिवसाच्या ट्रीपची मजा रंगात येत असतानाच आताा परत जावे लागणार असे सर्वाना सांगण्यात आले. डीजेवर थिरकरणारी पावले अचानक स्तब्ध झाली. अरे यह दिन तो जल्ही खतम हुआ अशी प्रतिक्रियाही काही कलाकारांनी त्वरित व्यक्त केली. या धम्माल ट्रीपची खबर लगोलग अन्य स्पर्धक वाहिनीवरील अन्य कलाकारांना लागली आणि ते चांगलेच हळहळले. काश हमे भी ऐसा ‘सहाारा’ अगर मिल गया होता तो क्या होता अशी प्रतिक्रियाही कांहींनी यानिमित्ताने व्यक्त केली.

लाफ इंडिया लाफ
हसा आणि फक्त हसाच. प्रत्येक वाहिनीवर याच आशयाचा एकतरी कार्यक्रम सुरू असतोच. हास्याच्या या रिअ‍ॅलीटी शो मध्ये काही विनोद हे विनोद वाटावे याच दर्जाचे असतात. अनेकदा कमरेखालील विनोदांनाही परीक्षकांकडून वाह क्या बात है अशी दाद दिली जाते. अलीकडेच लाईफ ओके या वाहिनीवर ‘लाफ इंडिया लाफ’ हा जुन्याच रुपरेषेवर आधारित कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये परीक्षक म्हणून अनेक वाहिनीवर चक्कर मारुन आलेला (परीक्षक म्हणून) शेखर सुमन यालाच स्थान देण्यात आले. कर्याक्रम सुरू झाल्यानंतर त्यामधील विनोद व तेच ते पंचेस पाहून व ऐकून वैतागलेल्या एका प्रेक्षकाने चित्रीकरण दरम्यान शेखर सुमनला विचारले की तुम्हाला गेली अनेक वर्षे  तेच ते विनोद ऐकून व त्यावर मन मारुन आपले मत देताना कंटाळा आला नाही का?  हास्याचा हा ओव्हर डोसने तुम्हावर तसेच ऐकेकाळच्या तुमच्या सहकलाकार अर्चना पुरणसिंग या अभिनेत्रीलाही खोटे खोटेच हसावे लागण्याची शक्यता आहे. या तिरकस प्रश्वावर शेखरेने काहीही उत्तर न देता तेथून हळूच काढता पाय घेतला.

रिअ‍ॅलीटी शो चे विषयच संपले
रिअ‍ॅलीटी शो च्या नावाखाली नाच, गाणी, करोडपती किंवा लखपती होण्यासाठी स्पर्ने दाखविण्याची किमया तसेच विक्षिप्त आणि तद्दन कलाकारांना  एकत्र एकाच घरात ठेवण्याचा ‘बिग बॉस’ हा तद्दन कार्यक्रम असे विविध फंडे वापरुन वापरून नेहमी प्रेक्षकांच्या माथी मारण्यात येतात. टीआरपीच्या आलेखावर मग कधी हे कार्यक्रम अचानक उसळी घेतात तर काही लुप्तही होतात. नाविन्यतेचा जराही लवलेष नसलेल्या या कार्यक्रमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवू नये यासाठी मग त्यामध्ये प्रेम, रोमान्स आणि विवाह हा विषय घुसडण्यात आला आहे. याचा पहिला अध्याय स्वयंवराच्या नावाखाली दाखविण्यात आलेल्या बालिष कार्यक्रमााने झाली होती. विवाह हा विषय तसा गंमतीचा अजिबातच नाही. पण त्यालाही रिअ‍ॅलीटी मुलामा देत वाहिन्यांनी त्याचे मार्केटिंग केले. स्वयंवराचा हा तमाशा आता पुन्हा नव्याने सुरू होणार असल्याची चर्चा सध्या छोटय़ा वतुर्ळात जोर धरु लागली आहे. आता यावेळी कोणाच्या आयुष्याचा बाजार मांडला जाणार आहे याचीच उत्सुकता सर्वाना लागली असतानाच राखीने म्हणे आता वेगळाच सुर लावला आहे. तिच्या म्हणण्यानुसार वाहिन्यांकडे कोणताही नवीन विषय नसल्याने तेच ते घिसेपिटे विषय प्रेक्षकांच्या माथी मारण्यात येत आहेत आता दस्तुरखुद्द राखीने असे म्हंटल्याने अनेकांची तोंडे आपोआपच बंद झाली आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gossip reality show

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी