“मुलीचा बाप झालो…” लेकीच्या इवल्याशा पावलांचे फोटो पोस्ट करत ‘या’ मराठी अभिनेत्याने शेअर केली गोड बातमी

लहानश्या परीच्या चिमुकल्या पावलांचे फोटोज शेअर करत या अभिनेत्याने ही आनंदाची बातमी दिली आहे. मुलीचा बाप झाल्यानं त्याचा आनंद गगनात मावेनासा झालाय.

govyachya-kinaryavar-fame-suhrud-wardekar-blessed-with-girl
(Photo: Instagram/ suhrudwardekar)

‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला आणि गोव्याच्या किनाऱ्यावर फेम अभिनेता सुहृद वार्डेकर यानं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटो आहे त्याच्या घरी आलेल्या एका खास व्यक्तीचा. अभिनेता सुहृद वार्डेकरच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं असून सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यानं ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

‘गोव्याच्या किनाऱ्यावर’ फेम अभिनेता सुहृद वार्डेकर याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या घरी आलेल्या लहानश्या परीच्या चिमुकल्या पावलांचे फोटोज शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. “मी बाप बनलोय…आम्हाला मुलगी झाली” असं लिहित त्याने या चिमुकल्या परीच्या आगमनाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. बाप बनल्याची फिलिंग त्याला खूप आनंद देऊन गेली आहे, हे पोस्टवरून अगदी सहज दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhrud Wardekr (@suhrudwardekar)

अभिनेता सुहृद वार्डेकर याने ही गोड बातमी शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून तसंच इतक कलाकार मंडळींकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. “आली एक गोडपरी लक्ष्मीच्या पावलांनी दारी” असं म्हणत सुहृद वार्डेकर घरी आलेल्या नव्या पाहुणीच्या स्वागतासाठीच्या तयारीला लागलाय.

 

अभिनेता सुहृद वार्डेकर फेब्रूवारी २०२० मध्ये पुण्यातील प्राची खडतकर सोबत लग्न बंधनात अडकला. सुहृद आणि प्राचीच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले असून त्यांच्या आयुष्यात आलेल्या चिमुकल्या परीमुळे ते दोघेही प्रचंड खूश आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhrud Wardekr (@suhrudwardekar)

सुहृद वार्डेकर मूळचा नागपूरचा आहे. त्याने सुरूवातीला एका रेडिओ जॉकी आणि साउंड इंजिनिअर म्हणून रेडिओ सिटी मध्ये काम केलं होतंे. त्यानंतर २०१८ मध्ये त्याचा ‘गोव्याच्या किनार्‍यावर’ एक म्युझिक अल्बम प्रदर्शित झाला होता. या अल्बमला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर सुहृदने ‘एक घर मंतरलेले’, ‘असावा सुंदर स्वप्नांचा बंगला’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’ यांसारख्या मालिकेत छोट्या मोठ्या भूमिका साकारून घराघरांत पोहचला. सुहृद लवकरच आता मल्हार गणेश दिग्दर्शित ‘दाह’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Govyachya kinaryavar fame suhrud wardekar and his wife have been blessed with their first child a baby girl prp