तुम्ही कधी नोटांचा पाऊस पडलेला पाहिला आहे का? सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये गायिकेवर चक्क नोटांचा पाऊस पडल्याचे दिसत आहे. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकले. गुजरातमधील एका कार्यक्रमात गायिका उर्वशी रादादियावर नोटांचा वर्षाव करण्यात आला आहे. कार्यक्रमातीला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गुजरातमधील एका कार्यक्रमात गायिका उर्वशी रादादिया परफॉर्म करत होती. दरम्यान, एक व्यक्ती तेथे येतो आणि उर्वशीच्या डोक्यावर नोटांचा वर्षाव करतो. ते पाहून उर्वशीवर जणूकाही पैशांचा पाऊस पडल्याचे भासत आहे. तसेच मंचाच्या आजूबाजून देखील काही व्यक्ती उर्वशीवर पैसे उडवताना दिसत आहे. त्यामुळे उर्वशी ज्या मंचावर बसली आहे तेथे नोटांचा खच पडल्याचे पाहायला मिळते.
आणखी वाचा : हृता दुर्गुळे ‘या’ दिग्दर्शकाला करतीये डेट, जाणून घ्या त्याच्या विषयी

a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
young Man takes selfie with leopard
Video : “डर के आगे जीत है..” शेतकरी तरुणाने घेतली चक्क चित्ताबरोबर सेल्फी, शेतातील व्हिडीओ होतोय व्हायरल
fake coca cola cold drinks making and packing video goes viral people got angry after watching
कोल्ड्रिंक्सच्या नावाखाली विकले जातेय विष? व्हायरल VIDEO मध्ये पाहा बनावट कोल्ड्रिंक्सचा काळाबाजार
72 meter tall flyover viral video
Fact check : गुजरातमध्ये बांधलाय ७२ मीटर उंचीचा ब्रिज? Viral होणारा व्हिडीओ नेमका कुठला?

उर्वशीच्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या प्रेक्षकांनी पैशांची उधळ केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत उर्वशीने ‘समस्त हीरावाडी ग्रूपद्वारा तुळशीच्या लग्नाचा कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता. तुम्ही माझ्यावर प्रचंड प्रेम करता त्यासाठी धन्यवाद’ या आशयाचे कॅप्शन उर्वशीने गुजरातीमध्ये दिले होते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी कमेंट करत हे धक्कादायक आहे असे म्हटले आहे.

कोण आहे उर्वशी रादादिया?
उर्वशी ही गुजरातमधील अतिशय लोकप्रिय गायिका आहे. ती काठियावाडाची cuckoo या नावाने ओळखली जाते. ‘नगर नंद जी ना लाल’ या गाण्यामुळे तिला लोकप्रियता मिळाली होती. ती अहमदाबादमध्ये लहानाची मोठी झाली आहे. ६ वर्षांची असताना तिने गाणे गाण्यास सुरुवात केली होती.