फिल्म सिटीच्या निर्णयाबद्दल गुल पनागने योगी आदित्यनाथांचे केले कौतुक म्हणाली…

उत्तर प्रदेशात उभी राहणार फिल्म सिटी….

माजी मिस इंडिया आणि अभिनेत्री गुल पनागने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दिल्ली-आग्रा एक्स्प्रेस वे जवळ फिल्म सिटी उभारण्याच्या योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.

“फिल्म सिटी उभारण्याचा निर्णय घेऊन, योगी आदित्यनाथ यांनी जी दूरदृष्टी दाखवली त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. या प्रकल्पाचे मी स्वागत करते, या प्रकल्पात सहभागी व्हायला मला आवडेल” असे गुल पनागने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.

“फिल्म सिटी उभारणीची ही योग्य वेळ आहे. मुंबईबाहेर आणखी फिल्म सिटीची आवश्यकता आहे. वेब सीरिज आणि OTT प्लॅटफॉर्मची वाढती संख्या लक्षात घेता हे आवश्यक आहे” असे गुल पनागने सांगितले. गुल पनागचे वडिल लष्करात अधिकारी होते.

“नव्या फिल्म सिटीमुळे चित्रीकरणासाठी जागा शोधण्याची समस्या दूर होईल. अनेक चित्रपट आणि मालिकांचे मुंबई बाहेर चित्रीकरण होते. दोन फिल्म सिटी तयार झाल्यामुळे फायदा होईल” असे गुल पनागने म्हटले आहे. फिल्म सिटीमुळे रोजगार निर्मिती होईल. नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात जाण्याचा स्थलांतराचा प्रश्न सुटेल असे गुल पनाग म्हणाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gul panag lauds up cm for new film city dmp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या