देशात सध्या ज्ञानवापी मशिदीचा वाद चांगलाच गाजतोय. अशात गीतकार मनोज मुंतशीर यांची एक कविता सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता विनोद बंन्सल यांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मनोज मुंतशीर ‘मस्जिद है या शिवाला, पत्थर गवाही देंगे’ ही कविता सादर करताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनोज मुंतशीर यांची ही कविता विनोद बंसल यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केली आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिलं, ‘किती मार्मिक आहे हा छोटासा व्हिडीओ’ मनोज मुंतशीर यांच्या या कवितेवर अनेक युजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. मनोज मुंतशीर मुस्लीम लोकांच्या विरोधात बोलत आहेत असं काही युजर्सचं म्हणणं आहे. तर काहींनी मात्र मनोज मुंतशीर यांच्या कवितेचं कौतुक केलं आहे.

अर्थात ही पहिली वेळ नाही की मनोज मुंतशीर यांनी अशा एखाद्या विषयावर कविता सादर केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ‘आप किसके वंशज है’ अशी एक कविता लिहिली होती. ज्यात त्यांनी मुघलांवर भाष्य केलं होतं आणि त्यांच्या कवितेला सोशल मीडियावर बराच विरोध झाला होता. त्यानंतर आता त्यांची ही नवी कविता ज्ञानवापी प्रकरणानंतर सोशल मीडियावर बरीच चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gyanvapi controversy manoj muntashir poem goes viral on social media mrj
First published on: 27-05-2022 at 09:39 IST