चित्रीकरणानंतर सर्वात जास्त वेळ ‘या’ ठिकाणी दिसते कतरिना

तिचे इन्स्टाग्रामवरील फोटो पाहून याचा तर पुरेपूर अंदाज येतो

कतरिना कैफ

‘टायगर जिंदा है’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालायला सज्ज झाला आहे. अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या सिनेमाशी निगडीत अनेक फोटो आणि व्हिडिओ वारंवार शेअरही करते. कतरिनाने शेअर केलेल्या फोटोंची चर्चा झाली नाही असे तर कधीच होत नाही. अवघ्या काही मिनिटांत तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरूवात होते. आता याच फोटोचे घ्या ना… तिने नुकताच तिचा व्यायाम करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि या फोटोला हजारोंनी लाइक्सही मिळाले. चित्रीकरणानंतर ती आपला जास्तीत जास्त वेळ जीममध्येच घालवते.

‘टायगर जिंदा है’ सिनेमाचा ट्रेलरही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमध्ये कतरिनाचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळतो. एरव्ही ‘बार्बी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी कतरिना या सिनेमात अफलातून अॅक्शन सीन करताना दिसते. कतरिनाचे हे सीन्स पाहून तिच्या फिटनेसचा अंदाजही लावता येऊ शकतो.

काही दिवसांपूर्वी कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती आलियाला ट्रेनिंग देताना दिसत होती. सलमानने अनेकदा कतरिनाच्या फिटनेसचे कौतुक केले आहे. कतरिना कामात कितीही व्यग्र असली तरी ती फिटनेसकडे कधीच दुर्लक्ष करत नाही. फिटनेससोबतच तिला फिरायलाही फार आवडते. तिचे इन्स्टाग्रामवरील फोटोपाहून याचा तर पुरेपूर अंदाज येतो. ग्रीसमध्ये फिरतानाचे तिने अनेफ फोटो शेअर केले आहेत. यातला तिचा आणि सलमान खानचा फोटो सर्वात जास्त व्हायरल झाला होता. या फोटोवर दोघांच्याही चाहत्यांनी लवकराच लवकर लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘टायगर जिंदा है’ या सिनेमातून सलमान आणि कतरिना ही जोडी जवळपास पाच वर्षांनी एकत्र येत आहेत. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये या दोघांमधील केमिस्ट्री स्पष्टपणे दिसून येत आहे. एक था टायगर या सिनेमाचा हा सीक्वल आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gym photos of katrina kaif goes viral on internet tiger zinda hai

ताज्या बातम्या