तो इतर पोरींसोबत सेक्स करायचा आणि मला…; हनी सिंगच्या पत्नीचा गंभीर आरोप

हनी सिंगच्या विरोधात पत्नी शालिनी तलवारने तक्रार दाखल केली आहे.

Honey Singh, Honey Singh Wife, Honey Singh Wife File Plea,
हनी सिंग आणि शालिनी यांनी २०११मध्ये लग्न केले.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर हनी सिंग एका वेगळ्याच प्रकरणामुळे सध्या चर्चेत आला आहे. हनी सिंगच्या विरोधात पत्नी शालिनी तलवारने छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायद्यांतर्गत शालिनीने हनी सिंगविरोधात तक्रार नोंदवली आहे. पती हनी सिंग तसेच सासरच्या मंडळीकडून शारीरिक, शाब्दिक, मानसिक छळासोबतच अत्याचाराला अनेकदा सामोरे जावे लागल्याचे शालिनीने म्हटले आहे.

पीटीआयने दिलेल्यावृत्तानुसार, हनी सिंगने गेल्या काही वर्षांमध्ये अनेकदा शालिनीला मारहाण केली आहे. तसेच हनी सिंगच्या कुटुंबीयांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप शालिनीने केला आहे. “मला एखद्या प्राण्यासारखी क्रूरपणे वागणूक देण्यात आली” असे शालिनीने म्हटले आहे. शालिनेने दाखल केलेल्या याचिकेत तिला गेल्या १० वर्षांपासून कश्या प्रकारे हिंसाचाराचा सामना करावा लागला याबद्दल सांगितले आहे.

आणखी वाचा : शाहरुख खानने हनी सिंगच्या लगावली होती कानशिलात?; पत्नी शालिनीनं सांगितलं केला होता खुलासा

‘तो इतर पोरींसोबत सेक्स करायचा आणि मला क्रूर वागणूक द्यायचा . तो कधीच आमच्या साखरपुड्याची अंगठी घालायचा नाही. तसेच लग्नातील फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे त्याने मारहाण केली होती’ असे शालिनी म्हणाली आहे. त्यानंतर शालिनीने सासऱ्यांवरही काही गंभीर आरोप केले आहेत. “एकदा सासरे दारुच्या नशेत मी कपडे बदलत असताना माझ्या रुममध्ये आले आणि त्यांनी माझ्या छातीवरून हात फिरवला” असे ती म्हणाली. शालिनीने तिच्यावर झालेल्या हिंसाचाराचे तिच्याकडे पुरावे असल्याचा दावा केलाय.

शालिनी तलवारने हनी सिंगविरुद्ध तक्रारी नोंदवल्यानंतर दिल्लीतील तीस हजारी सत्र न्यायालयाने हनी सिंगला नोटीस बजावली आहे. पाठवण्यात आलेल्या नोटीशीला २८ ऑगस्ट पूर्वी उत्तर देण्यास आदेशही न्यायालयाने दिले आहेत. हनी सिंगने दोघांच्या (पतिपत्नी यांची संयुक्त मालकी असलेली संपत्ती) नावावर असलेली मालमत्ता विकली आणि इतकंच नाही तर त्याने मानसिक छळ केल्याचा आरोप शालिनीने तक्रारीमध्ये केला आहे.

हनी सिंग आणि शालिनी यांनी २०११मध्ये लग्न केले. त्यापूर्वी ते एकमेकांना जवळपास २० वर्षे ओळखत होते. त्यांनी दिल्ली येथील फार्म हाऊसवर लग्न केले होते. पण त्यांच्या लग्नाविषयी फार कमी लोकांना माहिती होते. काही दिवसांपूर्वी हनी सिंगचे नाव अभिनेत्री डियाना उप्पलशी जोडले गेलं होतं. पण या सर्व अफवा असल्याचे नंतर हनी सिंगने स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Had casual sex and i felt like a farm animal being treated cruelly said by honey singh wife avb

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या