बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिना कैफ यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’हा चित्रपट काल ५ नोव्हेंबरला देशभरातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून करोनामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. पण काल अखेर भारतासह इतर अनेक देशातील जवळपास ४ हजार स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘सूर्यवंशी’ चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून या चित्रपटातील एक अभिनेत्री भावूक झाली आहे. नुकतंच तिने एक व्हिडीओ पोस्ट करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. यावेळी ती फार भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हेलिन शास्त्री हिने ‘सूर्यवंशी’ चित्रपटात छोटीशी भूमिका साकारली आहे. एखाद्या चित्रपटात संधी मिळण्याचा आनंद काय असतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हेलिन शास्त्री. सध्या हेलिनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात हेलिन सूर्यवंशी चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल सांगताना दिसत आहे. तसेच प्रेक्षकांनी तिच्या व्यक्तिरेखेची दखल घेतल्याने तिला अश्रू अनावर झाले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांचे आभार मानण्यासाठी तिने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

या व्हिडीओत हेलिन म्हणते की, “या चित्रपटात माझी भूमिका अगदी छोटीशी आहे. मात्र तरीही लोक माझे तोंडभरुन कौतुक करत आहेत. मला यावेळी रडायला का येतंय, मला माहिती नाही. पण कदाचित हे आनंदाश्रू असावेत. सूर्यवंशी हा केवळ माझ्यासाठी एक चित्रपट नसून त्या भावना आहेत,” असे तिने यावेळी सांगितले.

यावेळी हेलिनने चित्रपट पाहणाऱ्या सर्वांचे आभार मानले. “चित्रपटातील या भूमिकेवर सर्वचजण हसत होते. टाळ्या वाजवत होते. विशेष म्हणजे अक्षय सरांनी यावेळी माझा संवाद सुधारण्यासाठी आडनावाचा वापर केला,” असाही एक किस्सा तिने यावेळी सांगितले.

हेलिनने ‘सूर्यवंशी’ चित्रपटात मालविका गुप्ताची भूमिका साकारली आहे. मालविका ही या एटीएस टीमचा भाग आहे. तर याच टीमचा प्रमुख डीसीपी वीर सूर्यवंशी म्हणजेच अक्षय कुमार आहे. दरम्यान यापूर्वी हेलिनने अनेक मालिकेत काम केले आहे. यातील ‘अलिफ लैला’ या मालिकेत तिने राजकुमारी सारा ही भूमिका साकारली होती. तर ‘विघ्नहर्ता गणेश’ या मालिकेत तिने एका देवीची भूमिका साकारली होती.

‘सूर्यवंशी’ला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद

‘सूर्यवंशी’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक हा चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत आहे. मात्र कोरोनामुळे या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात येत होती. अखेर काल ५ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसोबत अजय देवगण आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्याचसोबत बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.