‘हमारी अधुरी कहानी’चे पहिले पोस्टर प्रदर्शित

अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री विद्या बालन यांच्या ‘हमारी अधुरी कहानी’ या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर अखेर सोमवारी प्रदर्शित करण्यात आले.

अभिनेता इमरान हाश्मी आणि अभिनेत्री विद्या बालन यांच्या ‘हमारी अधुरी कहानी’ या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर अखेर सोमवारी प्रदर्शित करण्यात आले. पोस्टर पाहता पुन्हा एकदा इमरान-विद्या या जोडीची उत्कृष्ट केमेस्ट्री पाहण्याची पर्वणी असणार आहे. ‘द डर्टी पिक्चर’ व ‘घनचक्कर’ या चित्रपटात काम केले होते. दोघांची जोडी प्रेक्षकांनाही पसंत पडली होती.’एक अधुरी कहानी’ चित्रपटात विद्या बालन आणि अभिनेता राजकुमार राव हे पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्या जीवनात इम्रान हाश्मीचा प्रवेश होतो. यामुळे होणारा संघर्ष चित्रपटात दाखविण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hamari adhuri kahani first poster emraan hashmi vidya balan emotional side

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या