scorecardresearch

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला; कॉन्सर्टमध्ये गाताना घडली घटना

बॉलिवूडमधील अनेक गायक गायिका गाण्याचे कार्यक्रम देशातच नव्हे जगभरात करत असतात

kailsh kher
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

‘अल्लाह के बंदे’, सैया, यांसारखी सुपरहिट गाणी देणारे सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर सध्या चर्चेत आले आहेत. आपल्या आवाजाने त्याने आज लाखो करोडो प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र नुकतीच त्यांच्या बरोबर एक घटना घडली आहे. त्यांच्या कार्यक्रमाला आलेल्या प्रेक्षकांमधील त्यांच्यावर हल्ला केला आहे.

कैलाश खेर सध्या कर्नाटकमध्ये आहेत. हंपी येथे भरलेल्या महोत्सवात त्यांचा गाण्याचा कार्यक्रम २९ जानेवारी रोजी संध्याकाळी ठेवण्यात आला होता. यांच्याबरोबर त्यांचा बँड त्यांना साथ देत होता. कार्यक्रम सुरु असताना प्रेक्षकांमधील काही तरुणांनी स्टेजवर पाण्याच्या बाटल्या फेकल्या, सुदैवाने यात त्यांना कोणती दुखापत झाली नाही.हल्ला करणाऱ्याला पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले.

हा हल्ला होण्यामागचं कारण सांगितलं जात आहे की प्रेक्षकांमधून एक जण वारंवार त्यांना कन्नड गाणे गाण्यासाठी सांगत होता मात्र कैलाश खेर यांनी ते गायले नाही. म्हणून त्या तरुणाने बाटल्या फेकल्या, पोलिसांनी जबाब नोंदवला त्यात हे कारण देण्यात आले आहे. कैलाश खेर यांनी स्वतः या महोत्सवात सहभागी होणार असे आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून जाहीर केले होते.

कर्नाटक राज्यात हंपी भागात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उदघाटन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते करण्यात आले होते. या महोत्सवात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार परफॉर्म करणार आहेत. तसेच बॉलिवूडचा आघाडीचा गायक अरमान मलिक हा देखील सहभागी झाला होता. एकूण तीन दिवसांचा हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 12:15 IST