“अनेक देशात गांजाचं सेवन कायदेशीर, आपल्याच इथे…”; आर्यन खानच्या अटकेवर हंसल मेहतांच वादग्रस्त विधान

या प्रकरणाची पुढील सुनावणी २० ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत आर्यनला कारावासातच राहावं लागणार आहे.

hansal-mehata-on aryan-khan-areest
(File Photo)

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी शाहरुखच्या कुटुंबियांना आणि आर्यनला पाठिंबा दिला आहे. काही सेलिब्रिटींनी तर ट्वीटरवरुन एनसीबीच्या कारवाईवर निशाणा साधला आहे. यातच आता फिल्ममेकर हंसल मेहता यांनी देखील एक ट्वीट केलं असून त्याचं ट्वीट चांगलच चर्चेत आलं आहे.

हंसल मेहता यांनी एक ट्वीट केलं असून यात ते म्हणाले, “गांजा किंवा भांगचं सेवन अनेक देशांमध्ये कायदेशीर आहे. अनेक ठिकाणी याला गुन्हा समजलं जात नाही. आपल्याच देशात मात्र याचा वापर नारकोटिक्स कंट्रोल पेक्षा जास्त छळ करण्यासाठी अधिक केला जातो. ज्याप्रकारे ३७७ कलम हटवण्यासाठी आंदोलन केलं गेलं तसंच हा खोडसळपणा बंद करण्यासाठी आंदोलन करण्याची गरज आहे.”असं ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

आर्यन खानच्या जॅकेटवरील ड्रग्ज संबंधित संदेश वाचून व्हाल थक्क, अटक होण्यापूर्वीच झाला होता स्पॉट


हंसल मेहता यांच्यासोबतच स्वरा भास्कर, तनीषा मुखर्जीसह अनेक सेलिब्रिटींनी आर्यन खानची अटक म्हणजे छळवाद असल्याचं म्हंटलं आहे. तसचं अनेकांनी आर्यनला पाठिंबा देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. सलमान खानला देखील शाहरुखच्या मन्नत बंगल्या बाहेर स्पॉट करण्यात आलं होतं. तसंच करण जोहरने देखील शाहरुख आणि गौरीची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

आर्यन खानने आर्थर रोड जेलमधून आई गौरी खानला व्हिडीओ कॉल केला अन् १० मिनिटे…

दरम्यान आर्यन खानच्या जामीन अर्जावर १४ ऑक्टोबरला पार पडलेल्या सुनावणीत त्याला दिलासा मिळालेला नाही. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत आर्यनला कारावासातच राहावं लागणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hansal mehata tweet on aryan khan arrest said marijuana consumption is legal in many countries kpw

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या