‘आमचे चित्रपट तुमच्या सरकारपेक्षा…’ जेव्हा फिरोझ खान यांनी पाकिस्तानला सुनावले होते

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या देशभक्तीसाठी ओळखले जातात.

‘आमचे चित्रपट तुमच्या सरकारपेक्षा…’ जेव्हा फिरोझ खान यांनी पाकिस्तानला सुनावले होते
firoz khan pakistan बॉलिवूड

भारत यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. यानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करत आहेत. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या देशभक्तीसाठी ओळखले जातात.

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे त्यांच्या देशभक्तीसाठी ओळखले जातात. यातील एक महत्वाचे नाव म्हणजे फिरोज खान. ज्यांनी थेट पाकिस्तानात भरलेल्या एका कार्यक्रमात पाकिस्तानला त्यांची जागा दाखवली होती. अभिनय आणि संवाद फेकीसाठी प्रसिद्ध असलेले फिरोज खान एप्रिल २००६मध्ये त्यांचा भाऊ अकबर खान यांच्या ‘ताजमहाल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी (लाहोर) पाकिस्तानला गेले होते. तिथे त्यांनी भारताचे कौतुक केले होते.

‘आमिर खानचं करिअर संपलं’ म्हणत केआरकेने शाहरुख-सलमानलाही दिला ‘हा’ इशारा

कार्यक्रमादरम्यान दरम्यान फिरोज खान यांनी पाकिस्तानच्या भूमीवर भारताचे कौतुक केले होते आणि म्हटले होते – भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे. तिथे मुस्लिमांची प्रगती होत आहे. आमचे राष्ट्रपती मुस्लिम, पंतप्रधान शीख. इस्लामच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती झाली, पण इथल्या मुस्लिमांची काय अवस्था आहे. ते आपापसात भांडत आहेत. याच कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानी निवेदक फखर-ए-आलमने अभिनेत्री मनीषा कोईराला यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यावर फिरोज खान संतापले. त्यांनी निवेदकाला फटकारले आणि म्हणाले, ‘तुम्ही मनीषा कोईरालाची माफी मागितली पाहिजे’.

फिरोज खान यांचे हे वागणे निवेदक फखर-ए-आलम आणि तेथे बसलेल्या अनेक पाकिस्तानींना इतके घृणास्पद वाटले की त्यांनी पाकिस्तानात आल्यावरच फिरोज खान यांच्यावर बंदी घातली होती. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तांना फिरोज खान यांना पाकिस्तानचा व्हिसा न देण्याचे आदेश दिले होते.

कार्यक्रमादरम्यान फिरोज खान म्हणाले होते – मी येथे स्वतःहून आलो नाही, मला बोलावले आहे. आमचे चित्रपट इतके शक्तिशाली आहेत की तुमचे सरकार त्यांना जास्त काळ रोखू शकत नाही. मात्र, या घटनेनंतर महेश भट्ट यांनी फिरोज खानच्या वतीने निवेदक फखर-ए-आलम आणि पाकिस्तानी जनतेची माफी मागितली होती.

फिरोज खान यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात ६०-७० च्या दशकात केली होती. वेलकम चित्रपटातील आरडीएक्स ही त्यांची व्यक्तीरेखा विशेष गाजली होती. फिरोज खान यांचे एप्रिल २००९ मध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे बंगळुरूमध्ये निधन झाले. फिरोज खान यांचा मुलगा फरदीन खान हा देखील बॉलिवूडमधला प्रसिद्ध अभिनेता आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘फॉरेस्ट गंप’ आणि ‘लाल सिंग चड्ढा’मधल्या ‘या’ दृश्यांमधील साम्य ठाऊक आहे का?
फोटो गॅलरी