मुलं आपल्या आई- वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवतात असं अनेकदा म्हटलं जातं. त्यातही कलाकारांची मुलं त्यांच्याप्रमाणेच कलाकार बनतात याला इतिहास साक्षी आहे. पण इतिहास बदलण्याची ताकदही काहींमध्ये असतेच. त्याचप्रमाणे अलका आणि समीर आठल्ये यांच्या मुलीने इतिहास बदलला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. २४ वर्षीय ईशानी व्यवसायाने पायलट आहे. आपल्या मुलीची प्रगती पाहून अलका आणि समीर यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. जे काही केले ते तिने केले आम्ही फक्त पाठिंबा दिला असं सांगताना त्यांच्या आवाजातला ईशानीसाठीचा अभिमान स्पष्ट जाणवतो.

‘ज्या दिवसाची आम्ही सगळेच इतकी वर्ष वाट पाहत होतो तो दिवस प्रत्यक्षात उतरला. ईशानीच्या मेहनतीचं चीज झालं. आपल्या मुलीला वैमानिकाचं ‘लाइफटाइम लायसन्स’ मिळणं काय असतं हा अनुभव मी शब्दात मांडू शकत नाही. तिला अगदी सातवी आठवीपासूनच वैमानिक व्हायचं होतं. मी तिला १० वी १२ वी मध्येही इतर क्षेत्रामध्ये जाण्याची इच्छा आहे का ते विचारलं. पण ती मात्र ठाम होती. मला आधीपासूनच वाटत होतं की माझ्या मुलींनी वेगळी क्षेत्र निवडावी. पण मी कधी त्यांच्यावर जबरदस्ती केली नाही. मला स्वतःलाही काही वेगळं करण्याची इच्छा होती पण परिस्थितीमुळे कधी शक्य झालं नाही,’ अशी प्रतिक्रिया अल्का त्यांनी त्यावेळी दिली होती.

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Iran Israel Attack Live Updates in Marathi
Iran Attack Israel : “आमच्यावर कोणी हल्ला करत असेल तर….”, भारतातील इस्रायलच्या राजदूतांनी दिला इशारा
vasai crime news, wife s murder accused marathi news
वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

‘ईशानीने २०१५ मध्येच अमेरिकेत अधिकृत लायसन्स मिळवलं होतं. पण तिला भारतात यायचं होतं म्हणून इथे येऊन तिने अनेक परीक्षा दिल्या आणि अखेर भारतातही लायसन्स मिळवलं. आई- वडिलांसाठी याहून आनंदाची गोष्ट काय असू शकते? माझी दुसरी मुलगी सध्या फिलिपाइन्सला एमबीबीएस करतेय तिलाही डर्मिटोलॉजिस्ट बनायचं आहे. दोघींनीही असे करिअर निवडले ज्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही. पूर्ण पाठिंबा देण्याशिवाय आम्ही काही केलं नाही, त्यांच्या मेहनतीनेच त्या पुढे जात आहेत,’ असं सांगताना अलका यांच्या आवाजात मुलींबद्दलचा गर्व स्पष्ट जाणवत होता.

ईशानी आठल्येनीही तिचा हा अनोखा अनुभव लोकसत्ता ऑनलाइनशी शेअर करताना म्हटले की, ‘मी लहानपणापासून जरी आई- बाबांना मनोरंजन क्षेत्रात वावरताना पाहत असले तरी मला या क्षेत्रात कधीच यायचे नव्हते. पण, सकाळी ९ ते रात्री ९ अशी नोकरीही करायची नव्हती. याउलट विमानतळावर मी पायलट, क्रु-मेंबर्स यांना एकटक बघायचे. त्यांचे गणवेश मला आकर्षक वाटायचे. विमान चालवणं ही काही तरी वेगळीच गोष्ट आहे. इथे प्रत्येक दिवस वेगळा असतो आणि खूप काही शिकवून जातो. सध्या जरी मला लायसन्स मिळालं असलं तरी ही माझ्या करिअरची पहिली पायरी आहे. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.’

‘मला २ वर्षांपूर्वी यूएसचे व्यावसायिक पायलटचे लायसन्स मिळाले होते. पण मला कोणत्याही परिस्थितीत परदेशात राहायचं नव्हतं. मी दोन वर्ष तिथे होते. पण असा एकही दिवस गेला नसेल जेव्हा मला घरच्यांची आणि मित्र मंडळींची आठवण आली नसेल. पगारामध्ये जरी तफावत असली तरी इथे माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. कितीही काम केलं तरी रात्री घरी आल्यावर माझी माणसं मला दिसणार यापुढे पगार काहीच नाही. त्यामुळेच मला यूएसमध्ये लायसन्स मिळूनही मी तिकडे कधी नोकरीसाठी प्रयत्नच केले नाहीत.’

अनेकदा शाळेत घेतलेले निर्णय कॉलेजमध्ये आल्यावर तरुणाईच्या झिंगेत विरून जातात. पण ईशानीसारखे फार क्वचितच असतात जी आपली स्वप्नं उराशी बाळगून त्याचा मागोवा घेतात आणि आई- वडिलांना अभिमान वाटावा अशी कामगिरी करतात.

मधुरा नेरूरकर
madhura.nerurkar@loksatta.com