भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी ऑफस्पिन गोलंदाज हरभजन सिंग हा काही दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा बाबा बनला. माजी अभिनेत्री गीता बसरा हिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. त्याचे नाव जोवन ठेवण्यात आले आहे. यापूर्वी या दाम्पत्याला एक गोड मुलगी आहे. सध्या हे दाम्पत्य फार आनंदात आहे. मात्र काही वर्षांपूर्वी हरभजनची पत्नी गीताला गर्भपाताचे दु:ख सहन करावा लागले होते. गीताने हे दु:ख एकदा नव्हे तर दोनदा सहन केले आहे. यामुळे ती मानसिकदृष्ट्या प्रचंड खचली होती. त्यानंतर तिने स्वत:ला कसे सावरले आणि त्यानंतर जोवनचा जन्म कशाप्रकारे झाला, याबाबतच संपूर्ण माहिती नुकतंच तिने एका मुलाखतीत दिली.

गीता बसरा हिने नुकतंच ई टाईम्स या वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी गीता म्हणाली, “गर्भपात हा स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्पा असतो. हल्ली गर्भपात करणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. आपली बदलती जीवनशैली कदाचित याला कारणीभूत आहे. पण यामुळे जग संपत नाही. तुम्ही आशा गमावू शकत नाही, असे मला त्या महिलांना सांगायचे आहे.”

obsessed girlfriend with a love brain disease viral
Viral : तरुणीला झाला ‘प्रेमाचा’ आजार! प्रियकराला करायची १०० मेसेज! डॉक्टर म्हणाले, “हिला…”
ms dhoni suresh raina
“मी तेव्हा धोनीला सांगितलं होतं”, चार वर्षांनंतर सुरेश रैनानं ‘त्या’ प्रसंगावर केला खुलासा; IPL २०२१ वरही केलं भाष्य!
happiness hashtag, balmaifal happiness
सुखाचे हॅशटॅग: गोष्ट छोटीशी, पण महत्त्वाची!
Female Student Death by Suicide
“सॉरी ताई..”, म्हणत १७ वर्षीय मुलीने आयुष्य संपवलं, लैंगिक शोषण झाल्याचा आरोप

“ही संपूर्ण घटना माझ्यासाठीही संघर्षमय होती. पण मी कधीही पराभव पत्करला नाही. हरभजन आणि मी आम्ही दुसऱ्या मुलासाठी प्रयत्न करणे, कधीही थांबवले नाही,” असेही तिने म्हटले.

यावेळी गीताने तिच्या डॉक्टरांचे आभारही मानले. ती म्हणाली, “ते फार सकारात्मक विचारांचे होते. त्यांनी त्या काळात मला खूप मदत केली. मला नकारात्मक विचार करायचे नव्हते. पण एका गोष्टीची चिंता होती की पुन्हा त्या घटनेचा मला सामना करावा लागू नये. यामुळे मी प्रचंड काळजी घेत होती. पण माझ्यावर विश्वास ठेवा, दुसऱ्यांदा गर्भपात झाल्यानंतर अवघ्या एक किंवा दोन महिन्यांनीच मला मुलं होईल ही अपेक्षा होती. विशेष म्हणजे एखादी ठराविक वेळ संपेपर्यंत तुम्ही पुन्हा प्रयत्न करू शकत नाही, असे काहीही नसते. गुगलवर याबाबत अजून बरीच माहिती उपलब्ध आहे.”

“पण जर आपण आपल्या डॉक्टरांचे म्हणणे ऐकले तर चांगलं होईल. डॉक्टरांना आपल्या शरीराबद्दल सर्व माहिती असते. आपण नेमके कशाबद्दल बोलत आहोत हे देखील त्यांना माहित असते.” असे गीताने सांगितले.

हेही वाचा : “बॅन लिपस्टिक”, तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

यावेळी गीता बसराने हरभजनचेही कौतुक केले. “या काळात मला भज्जीने फार सपोर्ट केला. मी आणि हरभजन दोघेही तयार होतो. तो नेहमी माझ्यासोबत प्रत्येक ठिकाणी यायचा. विशेष म्हणजे शेवटच्या तीन महिन्यात क्वचितच त्याने एखादी असाईनमेंट घेतली. आयपीएलचा तो एक महिना वगळला तर तो सतत माझ्यासोबत होता. हे फार छान होते. गरोदरपणात वडील आजूबाजूला असतील तर वडील आणि मुलाचे नाते फार घट्ट होते,” असेही तिने सांगितले.

हरभजन सिंग आणि गीता बसरा यांचे २९ ऑक्टोबर २०१५ रोजी लग्न झाले. हरभजन आणि गीताला हिनाया नावाची एक मुलगी आहे. हिनायाचा जन्म २०१६मध्ये झाला होता. गीताने २००६ मध्ये दिल दिया है या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले. त्यानंतर ती ‘द ट्रेन’, ‘जिला गाजियाबाद’, ‘सेकंड हैंड जवानी’ यासारख्या चित्रपटात झळकली. त्यानंतर २०१६ मध्ये ती लॉक या पंजाबी चित्रपटात शेवटची झळकली होती.