हार्दिक पांड्या हा आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूप कडक शिस्तीचा आहे. तो बऱ्याचदा आपले जिममधील वर्कआऊटचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. या वेळी हार्दिकने एक असा व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात तो उड्या मारत पुश-अप्स करताना दिसला. साहजिकच या अनोख्या पुश-अप्सची चाहत्यांना भुरळ पडली. केवळ चाहतेच नव्हे तर दोन ब़ॉलिवूड अभिनेत्री आणि स्टार महिला क्रीडापटूही या पुश-अप्सवर फिदा झाली.
हार्दिकने पोस्ट केलेला व्हिडीओ –
हार्दिकच्या त्या व्हिडीओवर अभिनेत्री संयमी खेर हिने, ‘हा वर्कआऊट खतरनाक आहे’, असे म्हटले. तर हिंदी मालिकांमुळे लोकप्रिय असलेली अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने, ‘Wow… हे तू कसं केलंस’, अशी कमेंट करत आश्चर्य व्यक्त केलं. त्याशिवाय, स्टार टेनिसपटू सानिया मिर्झानेही, ‘हे खूपच भारी आहे’, अशी कमेंट केली.
या साऱ्या कमेंटनंतर नताशाने झकास रिप्लाय दिला. तिने हार्दिक तंदुरुस्त असल्याचा इमोजी पोस्ट करत कमेंट केली.