scorecardresearch

‘मिस युनिव्हर्स’ होण्याआधी हरनाजने बनवला होता राजमा चावल, ‘बुआ’ उपासना सिंगने सांगितला मजेशीर किस्सा

उपासनाने एका मुलाखतीत हा मजेशीर किस्सा सांगितला आहे.

upasana singh, Harnaaz Sandhu,
उपासनाने एका मुलाखतीत हा मजेशीर किस्सा सांगितला आहे.

मिस यूनिवर्स हा ताज चंदिगढची हरनाज संधूने जिंकला आहे. मिस यूनिवर्स ही स्पर्धा इस्रायलमध्ये पार पडली. या स्पर्धेत भारतातील २१ वर्षीय हरनाझ संधूने सहभाग घेतला होता. जवळपास २१ वर्षांनंतर हरनाजने भारताला मिस यूनिवर्स हा किताब जिंकला आहे. तिच्या या विजयानंतर सगळ्या भारतीयांना आनंद झाला. तर दुसरीकडे द कपिल शर्मा शो या कॉमेडी शोमध्ये बुआची भूमिका साकारणाऱ्या उपासना सिंगने तिच्यात आणि हरनाजमध्ये असलेल्या नात्या विषयी सांगितले आहे. उपासनाने एका मुलाखतीत सांगितले की हरनाजने मिस यूनिवर्स होण्याआधी तिच्यासाठी राजमा चावल बनवला होता.

उपासना गेल्या काही काळापासून प्रोडक्शनचे काम करत आहे. यामुळे ती खूप व्यस्त असते. सध्या ती पंजाबी चित्रपटसृष्टीत निर्माती म्हणून सक्रिय आहे आणि तिने दोन चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. एवढचं काय तर आगामी चित्रपटात उपासना तिचा मुलगा नानकला लॉन्च करणार आहे. या चित्रपटात हरनाज ही मुख्य भूमिकेत असणार आहे. तर ‘आज तक’ला दिलेल्या मुलाखतीत उपासना म्हणाली, “इस्रायलला जाण्यापूर्वी हरनाझ तिच्यासोबत राहत होती. कधी-कधी तर हरनाजने जेवणही बनवले आहे आणि जाताना तिने उपासनाला राजमा चावला खाऊ घातला होता.”

आणखी वाचा : ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर कतरिनाचा भाऊ फिदा! पोस्ट शेअर करत म्हणाला…

उपासना पुढे म्हणाली की, “हरनाज जेव्हा तिच्यासोबत राहत होती तेव्हा ती अनेकदा म्हणायची, ‘मी जात आहे, मी मिस युनिव्हर्सचा ताज घेऊनच येईन आणि आता तिने के सिद्ध केले. तिने आपल्या देशाला गौरव मिळवून दिला ती माझ्या चित्रपटाचा एक भाग आहे याचा मला खूप आनंद आहे.” हरनाजचे कौतुक करताना उपासना म्हणाली, “ती मला गॉड मदर म्हणायची. जिंकल्यानंतर मी तिला फोन केला होता तेव्हा ती ओरडली आणि म्हणाली की मी माझे वचन पूर्ण केले आहे. तिच्याशी बोलून मी भावूक झाले. ती जेव्हाही मुंबईत यायची तेव्हा ती माझ्यासोबत राहायची.”

आणखी वाचा : “हिला कसला एवढा अॅटिट्यूड…”, जान्हवीचा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले

उपासना हरनाजच्या ट्रेनिंग विषयी बोलताना म्हणाली, “मिस इंडियानंतर जेव्हा तिची ट्रेनिंग सुरू झाली, त्याआधीही ती पाच दिवस आमच्यासोबत राहिली होती. फोनवर तिने सांगितले की, जेव्हाही ती मुंबईत येईल तेव्हा सगळ्यात आधी माझ्या घरी येईल.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Harnaaz sandhu cooked rajma chawal before bringing the miss universe crown india told upasana singh dcp

ताज्या बातम्या