Premium

‘हॅरी पॉटर’ फेम डॅनियल रॅडक्लिफ होणार बाबा; गर्लफ्रेंड एरिन डार्कचे बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो व्हायरल

२०१२ मध्ये ‘किल युअर डार्लिंग्स’चे चित्रीकरण करताना एरिन डार्कची डॅनियल रॅडक्लिफशी भेट झाली

daniel redcliff girlfriend pregnant
फोटो : सोशल मिडिया

हॅरी पॉटर फ्रँचायझीमधील भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला डॅनियल रॅडक्लिफ आणि त्याची गर्लफ्रेंड एरिन डार्क यांना लवकरच पहिलं आपत्य प्राप्त होणार असल्याची बातमी समोर आली आहे. ‘किल युअर डार्लिंग्ज’च्या सेटवर या जोडप्याची पहिली भेट झाली, ज्यामध्ये डॅनियलने कवी अॅलन गिन्सबर्गची भूमिका केली होती, तर एरिनने त्याच्या प्रेमात पडलेल्या स्त्रीची भूमिका साकारली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या बातमीला ‘यूएस वीकली’ने दुजोरा दिला आहे. त्यांच्या वृत्तानुसार, एरिनने तिच्या प्रियकरासह बाहेर पडताना तिचं बेबी बंप दाखवलं. तिने मॅचिंग लेगिनसह हुडी घातली होती आणि डॅनियलने हिवाळ्यातील टोपीसह पफर जॅकेट घातले. २०१२ मध्ये ‘किल युअर डार्लिंग्स’चे चित्रीकरण करताना एरिन डार्कची डॅनियल रॅडक्लिफशी भेट झाली. ते गेली बरीच वर्षं एकमेकांबरोबर रहात आहेत.

आणखी वाचा : चित्रपट सुपरहीट होऊनही सुनील शेट्टीने इतर व्यवसाय का सुरू ठेवले? अभिनेत्याने स्पष्ट केलं यामागील कारण

जरी हे जोडपे त्यांच्या नात्याबद्दल बरीच गुप्तता पाळून असले तरी, त्यांना एकमेकांबद्दल प्रचंड आदर आहे आणि ते कायमच एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. ‘वियर्ड: द अल यांकोविक स्टोरी’च्या प्रीमियरच्या वेळी एरिनने डॅनियलला पाठिंबा दिला आणि त्याच्यासह त्या कार्यक्रमाला हजेरीही लावली.

न्यूजवीकला दिलेल्या मुलाखतीत डॅनियल म्हणाला, “मला माझी मुलं हवी आहेत, जर ती असतील तर… त्यांना चित्रपटाच्या सेटच्या आसपास राहिलेली मला आवडेल.” याबरोबरच डॅनियल म्हणाला की त्याच्या मुलांनी चित्रपटाच्या सेटवर क्रूचा भाग व्हावे अशी त्याची इच्छा आहे. प्रसिद्धीबरोबरच त्याच्या संघर्षाबद्दल खुलेपणाने बोलणाऱ्या डॅनियलने हे स्पष्ट केलं की त्याला त्यांच्या मुलांनी फेमच्या आहारी जाऊ नये अशी त्याची इच्छा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Harry potter fame actor daniel radcliffe expecting first child girlfriend erin darke avn

First published on: 26-03-2023 at 12:59 IST
Next Story
Video: शिवीगाळ, अपमान अन्…; अब्दू रोझिक व एमसी स्टॅनमधील वादाबद्दल शिव ठाकरेची प्रतिक्रिया, म्हणाला, “ते दोघेही…”