बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांचा मुलगा आणि अभिनेता हर्षवर्धन कपूर गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. हर्षवर्धन वडील अनिल कपूर यांच्यासारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देऊ शकला नाही. मात्र, ओटीटी प्लॅटफॉर्मवर हर्षवर्धन स्वत: ची एक जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन त्याच्या ‘रे’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आला आहे. मात्र, तरी देखील अनेकांना त्याच्याकडून काही समस्या आहेत आणि त्याच कारण हे अनिल कपूर असल्याचे तो म्हणाला आहे.

हर्षवर्धनने आरजे सिद्धार्थ कन्नन याला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यासोबत चित्रपटसृष्टीतील त्याच्या करिअरविषयी देखील सांगितलं आहे. “मी जो मार्ग निवडला आहे, साधारण आणि धर्माला अनुसरून असणारे चित्रपट आणि मीडियामध्ये जास्त चर्चेत नसने. मला वाटेल ते करणे. जे लोक मला ओळखतात त्यांना कल्पना आहे की मला कशा प्रकारची कामं करायला आवडतात. त्यामुळे माझा इतका विरोध केला जातं नाही. अर्थात मी कितीही चांगले काम केले, कितीही चित्रपट केले. मी आयुष्यात काहीही केलं तरी लोकांना माझ्यात कमी दिसेल कारण मी अनिल कपूरचा मुलगा आहे,” असे हर्षवर्धन म्हणाला.

आणखी वाचा : ‘वडिलांच्या तिसऱ्या लग्नाची तयारी…’, बॉयफ्रेंड नुपुरसोबत शॉपिंगकेल्यामुळे आयरा झाली ट्रोल

आणखी वाचा : आमिर आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर इम्रानच्या पत्नीने केली होती ‘ही’ पोस्ट

हर्षवर्धन पुढे म्हणाला, “त्याला माहित आहे की यात तो काहीही करू शकत नाही. आता त्याने या गोष्टीला स्वीकारले आहे. तो लवकरच अनिल कपूरसोबत अभिनव बिंद्राच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे.” दरम्यान, हर्षवर्धनने २०१६ मध्ये ‘मिर्जया’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने ‘भावेश जोशी’ यात दिसला.