‘भाईजान’च्या मुन्नीलाही करीनाच्या बाळाची उत्सुकता

‘आपण कधी जायचे बाळाला भेटायला?’

सध्या सबंध ‘बी टाऊन’मध्ये करीना आणि सैफ अली खान या नवाबी जोडप्यावर चहुबाजूंनी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच त्यात आणखी एका निरागस शुभेच्छेची भर पडली आहे. या शुभेच्छेला ‘निरागस’ संबोधण्याचे कारणंही तितकेच गोड आहे. ‘बजरंगी भाईजान’ फेम हर्षाली मल्होत्रा, अर्थात ‘मुन्नी’नेही करीनाच्या आई होण्याची माहीती मिळताच तिच्या आईकडे ‘आपण कधी जायचे बाळाला भेटायला?’ अशा निरागस प्रश्नाचा तगादा लावला. ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ‘हर्षाली माझीच मुलगी वाटते’ असे करीना म्हणाली होती, ही एक आठवणही यावेळी हर्षालीच्या आईने सांगितली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Harshaali malhotras reaction to kareena kapoors pregnancy news is just too adorable

ताज्या बातम्या