‘बजरंगी भाईजान’च्या ‘मुन्नी’चा व्हिडीओ व्हायरल; तिला ओळखणं सुद्धा झालंय अवघड

सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटातील ‘मुन्नी’ म्हणजेच हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावरील लाखो फॅन्सच्या मनावर राज्य करतेय.

Harshaali-Malhotra-an-official-teenager-dance-video-viral

सलमान खानची सुपरहिट फिल्म ‘बजरंगी भाईजान’ मधली लहान मुलगी ‘मुन्नी’ची भूमिका साकारणारी हर्षाली मल्होत्रा सध्या चर्चेत आलीय. या चित्रपटात तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं होतं. आता हर्षाली मल्होत्रा सोशल मीडियावरील लाखो फॅन्सच्या मनावर राज्य करतेय. नुकतंच हर्षाली मल्होत्राने तिचा एक व्हिडीओ शेअर केलाय. यात ती एका इंग्रजी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसून येतेय.

हर्षाली मल्होत्राने तिच्या इन्स्टाग्राम अकउंटवर हा व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये तिने इंग्रजी गाणं डिनेरो या गाण्यावर आपला डान्स परफॉर्मन्स सादर केलाय. या व्हिडीओमध्ये तिने खूपच जबरदस्त डान्स सादर केलाय. यावेळी हर्षालीने ब्राउन टीशर्ट आणि ब्लॅक स्कर्ट परिधान केलाय. तिचा हा डान्स व्हिडीओला फॅन्सची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. तिच्या या व्हिडीओला आतापर्यंत १ लाख ८७ हजार लोकांनी पाहिलाय.

२०१५ साली रिलीज झालेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातून हर्षाली मल्होत्राने तिच्या अभिनयातील करिअरची सुरूवात केली होती. या चित्रपटात तिने ‘मुन्नी’ची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. या चित्रपटात अभिनेता सलमान खान याच्यासोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. या चित्रपटानंतर तिने अभिनेता अर्जुन रामपाल याच्या ‘नास्तिक’ चित्रपटात काम केलं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Harshali malhotra shares dance video on english song dinero video viral prp