५३ वर्षीही ‘फिट’ असलेल्या किशोरी शहाणेंचा हा व्हिडिओ पाहिलात का?

किशोरी शहाणे यांना डान्सची व व्यायामाची आवड असून सोशल मीडियावर नेहमीच त्या डान्सचे तसंच व्यायामाचे व्हिडिओ पोस्ट करत असतात. त्यांच्या चाहत्यांना हे व्हिडिओ आवडत आहेत.

सध्या किशोरी शहाणे या 'गुम है किसी के प्यार मै' या हिंदी मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे.

मराठी, हिंदी चित्रपट व मालिकांमध्ये दर्जेदार अभिनय करून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे किशोरी शहाणे. वयाच्या ५३ व्या वर्षीदेखील किशोरी शहाणे खूप फिट दिसतात. फिट राहण्यासाठी त्या नियमित व्यायाम करतात. याशिवाय त्यांना डान्सची आवड असून सोशल मीडियावर नेहमीच डान्सचे तसंच व्यायामाचे व्हिडिओ पोस्ट करत असतात. नुकतंच त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या वर त्यांच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा प्रचंड पाऊस पाडला आहे. या व्हिडिओला त्यांनी प्रेरणादायी कॅप्शनही दिलं आहे. ”आपल्या फिट ठेवण्यासाठी व्यायाम करा. वय हे मोठं युद्द आहे जे प्रत्येकाला लढायचं आहे,” असे त्यांनी म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kishori Shahane Vij (@kishorishahane)


किशोरी शहाणे या आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच अॅक्टिव्ह असतात. त्यांच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी त्या अभिनेत्री स्नेहा भावसार हिच्यासोबत ‘एक परदेसी मेरा दिल ले गया’ या गाण्यावर थिरकताना दिसल्या होत्या. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांनी भरभरून दाद दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kishori Shahane Vij (@kishorishahane)


सध्या किशोरी शहाणे या ‘गुम है किसी के प्यार मै’ या हिंदी मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. या मालिकेतील त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. ‘बिग बॉस मराठी २’ या रिअॅलिटी शोमध्येही त्यांनी भाग घेतला होता. या रिअॅलिटी शोमध्ये त्यांची अनोखी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Have u seen video of kishori shahane while doing workout mrs

ताज्या बातम्या