‘१ ते २० वयोगटातील मला काकू बोलू शकतात, कारण..’, हेमांगी कवीची वाढदिवसाची पोस्ट चर्चेत

हेमांगीचा आज वाढदिवस असून ती आज ४१ वर्षांची झाली आहे.

hemangi kavi, hemangi kavi instagram,
हेमांगीचा आज वाढदिवस असून ती आज ४१ वर्षांची झाली आहे.

मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीचा आज वाढदिवस आहे. आज हेमांगी ४१ वर्षांची झाली आहे. हेमांगी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती बिनधास्तपणे तिचे मत मांडताना दिसते. तसेच ती ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देताना दिसते. आज तिच्या वाढदिवसानिमित्त हेमांगीने एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी तिने सरळ गूगलला ट्रोल केलं आहे.

हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत हेमांगीने काळ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाचं स्कर्ट परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत ‘मला ४१ व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्या! गूगल वर जन्मतारीख बरोबर आहे पण सालाची (Birth Year) नोंद चुकीची आहे याची कृपया मंडळाने नोंद घ्यावी! धन्यवाद! जे १ ते २० वयोगटातील आहेत. ते मला काकू बोलू शकतात. कारण काकू म्हटल्यावर न चिडण्याचं वय आता झालंय!,’ असे हेमांगी म्हणाली.

आणखी वाचा : ५६ वर्षांच्या प्रकाश राज यांनी पुन्हा एकदा केले लग्न, फोटो व्हायरल

आणखी वाचा : बिग बॉस ओटीटीच्या घरात हाणामारी, घरातून स्पर्धकाला दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता

काही दिवसांपूर्वी हेमांगीला एका व्हिडीओमुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर तिने एक पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर दिले होते. “ब्रा, ब्रेसीयर (अंतर्वस्त्रा)चा चार लोकांसमोर किंवा सोशल मीडियावर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रीच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या प्रतिमेचा जो काही संबंध जोडला जातो त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती संघर्ष करायचाय हे लक्षात येतं! आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठलं पदक मिळवतात कुणास ठाऊक!”, अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली होती.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hemangi kavi shared a post on her 41 th birthday and said now people from 1 to 20 age group can call me aunty dcp

ताज्या बातम्या