“मी घरात, बाहेर अंर्तवस्त्र घालायचं की नाही हा माझा प्रश्न”, हेमांगी कवीचं सडेतोड उत्तर

हेमांगी कवीने कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.

hemangi-kavi
(Photo-instagram@hemangiikavi)

मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या दमदार अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आणि टेलिव्हिजन विश्वात प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. हेमांगी सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. तर अनेकदा हेमांगी सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत असते. हेमांगीने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओवर तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र हेमांगीने एक पोस्ट शेअर करत या नेटकऱ्यांची बोलती बंद केलीय.

हेमांगी कवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर “गोल पोळ्याचं गुपित!” असं कॅप्शन देत एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंटनंतर हेमांगीने तिच्या इन्स्टास्टोरीवर एक पोस्ट शेअर केलीय. यात हेमांगी कवीने कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे. ती म्हणाली, “हो मला स्तन आहेत. त्याला स्तनाग्रेही आहेत अगदी पुरुषांसारखी! जसे चालताना माझे हातपाय हलतात तसचे काम करताना माझे स्तन हलतात. कारण मी सस्तन प्राणी आहे. मादी आहे! ज्यांचे हलत नाहीत अशांना माझा त्रिवार सलाम. आता मी घरात, बाहेर, सोशल मीडियावर अंर्तवस्त्र (ब्रा) घालायची कि नाही ही माझी पंसत आहे.”

हे देखील वाचा: “मराठीतला रणवीर सिंह”; अभिजीत खांडकेकरच्या हटके लूकवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

पुढे हेमांगी म्हणाली, “या व्हिडीओत दिसणारे माझे स्तन आणि स्तनाग्रे, त्यावरून मला जज करण्याचा, अश्लिलतेचा, माझ्या संस्कारांचा माझ्या बुद्धीमत्तेचा, माझ्या इमेज विषयी घाणेरड्या चर्चा, गॉसिप करून जो काय संबध जोडताय ती तुमची पसंती” असं म्हणत हेमांगीने ट्रोलर्सचा समाचार घेतलाय.

hemangi-kavi-post
(Photo-instagram@hemangiikavi)

हेमांगी कवीने तिच्या इन्स्टाग्रामवर गोल पोळ्या कशा कराव्या याचा एक व्हिडीओ शेअर केला होता.

हे देखील वाचा: “काळ्या मुली कॅमेऱ्यात चांगल्या दिसत नाहीत’; ‘ती’ महिला सोनाली कुलकर्णीला म्हणाली होती

याशिवाय हेमांगीने तिच्या इन्स्ट स्टोरीच्या पोस्टमध्ये पुन्हा एक तळटीप दिलीय. यात ती म्हणाली “मला डायरेक्ट मेसेज करून माझ्या विषय काळजी दाखवणाऱ्या हितचिंतकांनो..चिल… या एवढ्या चिंधी गोष्टीवरुन मला अनफॉलो करावसं वाटतं असेल तर खुशार करावं. विचित्र विचारांचे फॉलोअर्स नसलेलं कधीही चांगल” असं ती म्हणालीय.

ट्रोल करणाऱ्यांला सडेतोड उत्तर देण्याची हेमांगीची ही पहिली वेळ नाही या आधी देखील हेमांगीने अनेकदा ट्रोलर्सची बोलती बंद केलीय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hemangi kavi slams to troll said wearing bra in home outdoor or on social media is my choice kpw

ताज्या बातम्या