बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी सुष्मिता सेन ही आत्या बनली आहे. सुष्मिता सेनची वहिनी आणि अभिनेत्र चारु असोपा हिने नोव्हेंबर महिन्यात मुलीला जन्म दिला. त्यानंतर ती सिनेसृष्टीत फारशी सक्रीय नसली तरी सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. अनेकदा ती तिचे आणि बाळाचे विविध फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच चारुने तिची लाडकी लेक झियानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
चारुने शेअर केलेल्या या व्हिडीओत तिची लेक बाबागाडीत बसल्याचे दिसत आहे. यावेळी तिच्यासमोर टिव्ही सुरु असून त्यावर सुष्मिता सेनचे चुनरी चुनरी हे गाणे लागल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे आत्याच्या या गाण्यावर भाची झियानाही छान प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहे.




हा संपूर्ण व्हिडीओ पोस्ट करत चारुने सुष्मिताला टॅग केले आहे. यावर ती म्हणाली की, ‘आत्याची लाडकी आत्याचे गाणे एन्जॉय करत आहे’. त्यावर ‘Awww आत्याची लाडकी आहे ती… फार आठवण येतेय तुझी’, असे सुष्मिता सेनने म्हटले आहे. दरम्यान चारुने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यावर अनेक कमेंट आणि लाईक्स पाहायला मिळत आहेत.
शाहरुखच्या लेकीने पोस्ट केला मैत्रिणींसोबत पार्टी करतानाचा फोटो, म्हणाली…
चारूने २०१९ मध्ये सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनसोबत लग्न केले होते. या दोघांनी राजस्थानी आणि बंगाली रितीरिवाजांनुसार लग्न केले. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. ‘मेरे अंगने में’ फेम चारू असोपा आणि राजीव सेन संग यांना गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव झियाना असे ठेवले आहे.