‘या’ कारणामुळे सलमान खान कतरिना आणि विकीच्या लग्नाला राहणार गैरहजर

कतरिना कैफ आणि विकी कौशल ९ डिसेंबर रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत.

katrina kaif and vicky kaushal, vicky katrina wedding, vicky katrina wedding photos, vicky katrina wedding videos, vicky katrina wedding photos instagram, vicky kaushal and katrina kaif wedding, vicky kaushal photos, katrina kaif, katrina kaif photos in instagram, katrina kaif mehandi photos, katrina kaif dress in marriage, vicky katrina wedding venue, vicky katrina wedding news, vicky katrina wedding latest news, vicky katrina wedding marathi news, katrina kaif and vicky kaushal wedding live updates, katrina kaif and vicky kaushal love story, katrina kaif and vicky kaushal marriage rules, कतरिना आणि विकी, कतरिना आणि विकी लग्न, कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्न, कतरिना आणि विकी विवाह, कतरिना आणि विकी फोटो, कतरिना आणि विकी व्हिडिओ, कतरिना आणि विकी सोशल मीडिया व्हायरल फोटो

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल ९ डिसेंबर रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. राजस्थानमधील एका किल्ल्यावर त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नासाठी सर्व कुटुंबीय राजस्थानला पोहोचले आहेत. अनेक कलाकार देखील त्यांच्या लग्नाला हजेरी लावणार आहेत. अशातच बॉलिवूडचा भाईजान सलमान खान कतरिनाच्या लग्नाला जाणार की नाही? हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

सलमान खानचा बॉडीगार्ड शेराने कतरिनाच्या लग्नाच्या सिक्योरिटीची जबाबदारी घेतली आहे. शेरा याकडे विशेष लक्ष देणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कतरिनाने सलमान खानला लग्नाचे आमंत्रण दिलेले नाही अशा चर्चा रंगल्या होत्या. सलमानची बहिण अर्पिताने खान शर्माने एका मुलाखतीमध्ये कतरिनाने लग्नाचे आमंत्रण दिले नसल्याचे स्पष्ट केले.
आणखी वाचा : कतरिना कैफ आणि विकी कौशलच्या लग्नावर सलीम खान यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

ईटाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान खानची Da-bangg टूर सुरु होत आहे. १० डिसेंबर रोजी रियाधमध्ये त्याला परफॉर्म करायचे आहे. सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा रियाधमध्ये असणार आहेत. त्यामुळे सलमान कतरिनाच्या लग्नाला जाणार नसल्याचे समोर आले आहे.

६ डिसेंबर पासून सलमानने ‘टायगर ३’चे चित्रीकरण पुन्हा सुरु केल्याचे म्हटले जात आहे. शूटिंगमधून वेळ काढून तो रियाध टूरला जाणार आहे. सूत्रांनी ईटाइम्सला दिलेल्या माहिती नुसार, सलमान बुधवारी ८ डिसेंबर रोजी रियाधला असणार आहे आणि त्यामुळे कतरिनाच्या लग्नाला जाण्याचा प्रश्नच येत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Here is reason why salman khan and his bodyguard to miss katrina kaif vicky kaushal wedding avb

Next Story
तृप्ती देसाई पुन्हा बिग बॉसच्या घरात, व्हिडीओ व्हायरल
फोटो गॅलरी