scorecardresearch

“एक प्रेक्षक म्हणून…”, ‘चंद्रमुखी’ चित्रपट पाहिल्यानंतर अमृता खानविलकरच्या पतीची पहिली प्रतिक्रिया

अमृता खानविलकरचा पती हिमांशू मल्होत्राने तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

मराठीतील सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. उत्तम अभिनय, कमालीचा डान्स आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख आहे. मराठी सिनेसृष्टीत अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्येही असते. अमृताने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका, वेबसीरीजमध्ये काम केले आहे. सध्या ती चंद्रमुखी या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. चंद्रमुखी हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट होताना दिसत आहे. नुकतंच अमृता खानविलकरचा पती हिमांशू मल्होत्राने तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.

अमृता खानविलकरचा पती अभिनेता हिमांशू मल्होत्रा हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने पत्नी अमृता खानविलकरचा चंद्रमुखी हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर तो प्रचंड भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. हिमांशूने चंद्रमुखी या चित्रपटातील एका सीनचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने दिलेल्या कॅप्शनमध्ये अमृताचे कौतुक केले आहे.

“तू जे केलंस त्यासाठी माझ्याकडे शब्द नाही…”, अमृता खानविलकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

हिमांशू मल्होत्राची अमृता खानविलकरसाठी खास पोस्ट

“काल रात्री मी जे काही पाहिलं ते एका कलाकाराने दिलेले तेजस्वी सुख होतं. तू ज्या पद्धतीने चंद्रमुखी साकारली आहेस, ती मनाचा खोलवर ठाव घेणारी आहे. एक प्रेक्षक म्हणून मी त्यावेळी त्या चंद्रमुखीच्या प्रेमात पडलो. त्याक्षणी मला तिला माझ्यासोबत घेऊन जावंस वाटलं. तिचे संरक्षण करावंस वाटलं.

मला त्यावेळी तिच्यातील वेदना जाणवल्या आणि मी तिच्यातील एक भाग आहे, असंही क्षणार्धात मला वाटलं. मनाचा घाव घेणारी, निष्पाप, खोलवर जखम झालेली असली तरीही तिचे शुद्ध अंतकरण पाहून मी भरुन पावलो आहे. तिच्या प्रवासाचे साक्षीदार झालेल्या सर्वांनाच तिने मोहिनी घातली आहे.

अमृता…. तुझ्या माध्यमातून तू आम्हा सर्वांना चंद्रमुखीच्या प्रवासाचे साक्षीदार बनवल्याबद्दल तुझे धन्यवाद.

कलाकाराच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर येणारी प्रत्येक भूमिका ही एका खास हेतूसाठी येते आणि तो हेतू म्हणजे पुन्हा स्वत:शीच कनेक्ट होणे. कलाकार करत असलेली प्रत्येक भूमिका ही त्याच्या आत्मावर खोलवर ठसा उमटवते. चंद्रमुखी ही तुझ्यासाठी तेच करेल.

या प्रवासात तुला स्वत:चा खरा शोध घेण्यासाठी, पुढे जाण्यासाठी आणि पुन्हा मागच्या गोष्टींसोबत रि-कनेक्ट होण्यासाठी नक्कीच मदत करतील. अमृता मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे आणि मला तुझा खूप अभिमान वाटतो. लव्ह….”, असे हिमांशूने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

“ज्यांनी गेली दोन वर्ष…”, ‘चंद्रमुखी’ चित्रपट सुपरहिट ठरल्यानंतर अमृता खानविलकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

हिमांशूची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. अनेक मराठी-हिंदी कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे. हिमांशूने अमृतासाठी लिहिलेली ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे. दरम्यान अमृता खानविलकर ही सध्या चंद्रमुखी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२१ कोटींची कमाई केली आहे. तर पाच दिवसात या चित्रपटाने जवळपास ६.२१ कोटींचा गल्ला जमवला आहे.

सध्या या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच हा चित्रपट मराठी चित्रपटाच्या यशातील एक महत्वाचा चित्रपट ठरताना दिसत आहे. तसेच जागतिक पातळीवरही हा चित्रपट सुपरहिट ठरताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Himanshu malhotra share instagram post for actress amruta khanvilkar chandramukhi movie nrp