VIDEO: रानू मंडल यांच्याबद्दल बोलताना हिमेश रेशमियाला आश्रू झाले अनावर

‘तेरी मेरी कहानी’ गाणे प्रदर्शित झाले त्या प्रसंगी हिमेश बोलत होता

हिमेश रेशमियाला आश्रू झाले अनावर

सोशल मिडियावरुन रातोरात स्टार झालेल्या गायिका रानू मंडल यांचे पहिले गाणे ‘तेरी मेरी कहानी’ बुधवारी मुंबईमध्ये एका भव्य कार्यक्रमामध्ये प्रदर्शित करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये रानू मंडल यांचे आगळेवेगळे रुप पहायला मिळाले. सामान्यपणे साध्या साडीत दिसणाऱ्या रानू मंडल यांनी लाल रंगाची छान सिल्कची साडी नेसली होती. या कार्यक्रमामध्ये रानू यांना पहिल्यांदाच सिनेमात गाण्याची संधी देणारा अभिनेता आणि गीतकार हिमेश रेशमियाही उपस्थित होता. यावेळी रानू यांच्याबद्दल बोलताना तो अगदी भावूक झाल्याचे पहायला मिळाले.

हिमेश या कार्यक्रमामध्ये आपल्या आगामी सिनेमाबरोबरच रानू यांच्याबद्दलही भरभरुन बोलला. अचानक रानू यांच्याबद्दल बोलता बोलता त्याचा कंठ दाटून आला. आपल्या प्रयत्नांमुळे रेल्वे स्थानकावर गाणाऱ्या एका चांगल्या गायिकेला इतके मोठे व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे बोलताना हिमेश रडू लागल्याने हे त्याचे आनंदाश्रू होते अशी चर्चा उपस्थितांमध्ये सुरु झाली.

हिमेश हे डोळ्यामधून आश्रू येत असतानाही बोलतच होता. त्यामुळे अखरे त्याची पत्नी सोनिया कपूर जागेवरुन उठली आणि तिने हिमेशचे आश्रू पुसले. त्यानंतर स्वत:ला सावत हिमेश पुन्हा बोलू लागला. हिमेशच्या आगमी सिनेमातील रानू यांनी गायलेले हे गाणे प्रदर्शनापूर्वीच लोकप्रिय झाले आहे. या गाण्याच्या रेकॉर्डींगचा व्हिडिओ हिमेशने सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केला होता. त्याला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले होते.

पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्थानकावर गाणं गाणाऱ्या रानू या सोशल मिडियामुळे खूप लोकप्रिय झाल्या. याच लोकप्रियतेमधून हिमेशने त्यांना आपल्या सिनेमात गाण्याची संधी दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Himesh reshammiya breaks down for ranu mondal at the song launch of teri meri kahani scsg

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या