छोट्या पडद्यावरील अभिनेत्री हिना खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. हिनाला ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून खरी लोकप्रियता मिळाली. नुकताच हिनाचा एक म्युझिक व्हिडीओ प्रदर्शित झाला. ‘मैं भी बर्बाद’ असे या म्युझिक व्हिडीओचे नाव आहे. या म्युझिक व्हिडीओत हिनासोबत अंगद बेदी आहे. तर म्युझिक व्हिडीओतील तिच्या लूकचे कौतुक केले जात आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हिनाने तिच्या रंगामुळे अनेक भूमिका न मिळाल्याचे सांगितले आहे.

हिनाने नुकतीच ‘ईटाइम्स’ला मुलाखत दिली आहे. यावेळी हिना तिच्या लुक्स विषयी बोलली आहे. तिचा रंग सावळा असल्याने तिला अनेक भूमिका मिळाल्या नाही असे तिने सांगितले. काश्मिरी असूनही तिला एका चित्रपटात काश्मिरी मुलीची भूमिका देण्यात आली नव्हती कारण ती तिचा रंग फार गोरा नाही. “मी त्या चित्रपटाबद्दल सांगणार नाही पण मला आठवते की मला तो प्रोजेक्ट न मिळण्याचे कारण मी काश्मिरी मुलीसारखी दिसत नाही. माझा रंग सावळा आहे आणि मी फार गोरी नाही,” असे हिना म्हणाली.

आणखी वाचा : KBC 13 : १५ व्या प्रश्नाचे उत्तर देत सविता ठरणार शोच्या दुसऱ्या करोडपती?

हिना पुढे म्हणाली, “टीमला भूमिकेनुसार फार गोरी मुलगी हवी होती. मला वाईट वाटले कारण जेव्हा तुम्हाला ती भाषा कळते तेव्हा तुम्ही तुमची भूमिका अधिक चांगल्या प्रकारे साकारू शकतात. पण मला ती भूमिका मिळाली नाही कारण मी काश्मिरी दिसत नाही. तरीही, मी आशा सोडली नाही आणि नेहमी प्रयत्न करत राहीन.”

आणखी वाचा : सैफने सांगितले होते अमृताशी घटस्फोट आणि करीनासोबत लग्न करण्याचे खरं कारण

हिनाने विक्रम भट्ट यांच्या ‘हॅक’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात हिना खान सोबत मोहित मल्होत्रा ​​आणि रोहन शाह मुख्य भूमिकेत दिसले होते. आता लवकरच हिना तिच्या आगामी बॉलिवूड चित्रपटाची घोषणा करणार आहे.