scorecardresearch

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी हिना खानने केली ‘अशी’ तयारी, शेअर केला व्हिडीओ

हिना खानने ‘चक दे इंडिया’ असं कॅप्शन देत याच गाण्यावर हे रील शेअर केलंय.

भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी हिना खानने केली ‘अशी’ तयारी, शेअर केला व्हिडीओ
(Phot-Instagram@realhinakhan)

आईसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये रविवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना रंगणार आहे. देशभरात या खास सामन्यासाठी उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. यातच अभिनेत्री हिना खानदेखील हा सामना पाहण्यासाठी खूपच उत्सुक असल्याचं पाहायला मिळतंय. हिनाने एक व्हिडीओ शेअर करत तिने ही मॅच पाहण्यासाठी खास तयारी केल्याचं सांगितलंय.

हिनाने शेअर केलेल्या व्हिडीओत ती भारत-पाक सामना पाहण्यासाठी सज्ज होत असल्याचं दिसतंय. सामना पाहण्यासाठी तिने स्नॅक्स आणि कोल्ड्रिंग घेतलंय. तर खास निळ्या रंगाची जर्सी परिधान करून तिने भारतीय खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी गालावर तिरंग्यांचे रंग लावले आहेत. या व्हिडीओत प्रत्येक भारतीय चाहता कशाप्रकारे कुतुहलाने मॅच पाहतो हे तिने दाखवलंय. तर सामना जिंकल्यावर तिला किती आनंद होतो. आनंदाच्या भरात ती नाचू लागते हे हिनाने तिच्या व्हिडीओतून दाखवण्याता प्रयत्न केलाय. हिनाने या व्हिडीओतून भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

आता छोटे व्यवसायिक आणि दुकानदारांच्या जाहिरातींमध्येही झळकणार शाहरुख खान


हिना खानने ‘चक दे इंडिया’ असं कॅप्शन देत याच गाण्यावर हे रील शेअर केलंय. हिनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सोशल मीडियावर हा सामना पाहण्यासाठी भारतीय प्रेक्षक आतुर असल्याचं कळतंय अनेक मीम्स देखील व्हायरल झाले आहेत. तर सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे.

हिना खानदेखील सोशल मीडियावर चांगलीत सक्रिय असते. वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-10-2021 at 16:37 IST

संबंधित बातम्या