…आणि हिना खान झाली पुन्हा एकदा ट्रोल!

लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या ११ व्या सीझनमध्ये ती ख-या अर्थाने नावारुपाला आली.

हिना खान

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेमधून  प्रेक्षकांसमोर आलेली हिना खान तिच्या अभिनयापेक्षा खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहत असते. ‘ये रिश्ता..’ या मालिकेमध्ये सोज्वळ सुनेची भूमिका साकारणारी हिना ख-या आयुष्यात पूर्णपणे वेगळी आहे. तिच्या फटकळपणामुळे ती अनेक वेळा चर्चेत राहतं असते. इतकंच नाही तर तिला वेळा टिकेचं धनीदेखील व्हावं लागलं आहे. लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’च्या ११ व्या सीझनमध्ये ती ख-या अर्थाने नावारुपाला आली. मात्र लोकप्रियता मिळविण्याबरोबरच तिच्यावर सतत टिकेचा भडीमार देखील झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे सध्या हिना पुन्हा एकदा चर्चेत आली असून नेटक-यांनी तिच्यावर टिकास्त्र सोडले आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये अव्वल स्थान मिळविणारी हिना सोशल मिडीयावर सतत अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अनेक वेळा डान्सचे, एक्सरसाईजचे व्हिडिओ, फोटो शेअर करत असते. त्याप्रमाणेच आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्त साधत हिनाने योगा करतानाचे काही फोटो इन्स्टावर शेअर केले होते. मात्र हे फोटो पाहताच तिच्यावर कौतूकाचा पाऊस पडण्याऐवजी नेटक-यांनी टिकास्त्र सोडले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्त साधत अनेक सेलिब्रेटींनी योगा करतानाचे व्हिडिओ, फोटो शेअर केले होते. त्याप्रमाणे  हिनाने देखील योगाचे फोटो शेअर केले.मात्र नेटक-यांनी तिच्यावर टिका करण्यास सुरुवात केली. हिनाचे फोटो पाहताच काही नेटक-यांनी तिला नमाज पठण करण्याचा सल्ला दिला. एका ट्रोलक-याने तर तिला ‘नमाज पठण करणं हा देखील एक उत्तम योगा प्रकार’ असल्याचं सांगितलं.

दरम्यान, या फोटोमुळे ज्याप्रमाणे हिना ट्रोल झाली त्याप्रमाणेच रमजानमध्येही तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली होती. रमजान सुरु असताना तिने एका डान्सचा व्हिडिओ शेअर केला होता. जो पाहताच नेटक-यांनी तिला संस्कार आणि संस्कृतीची आठवण करुन दिली होती.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hina khan trolled yoga pictures