याचसाठी के ला होता सारा अट्टहास… अशी अवस्था हिंदीतील चित्रपट निर्माते, वितरक, चित्रपटगृह व्यावसायिक, दिग्दर्शक, कलाकार मंडळी सगळ्यांचीच झाली असावी. खरंतर, टाळेबंदीनंतर गेल्या वर्षी दिवाळीतही चित्रपट प्रदर्शनाला सुरुवात झाली होती. मात्र त्या वेळी करोनाचे सावट पुरते गेले नव्हते आणि लसीकरणाचे शस्त्रही हाती नसल्याने प्रेक्षकही अगदी मोजक्या संख्येने आणि सावधपणे चित्रपटगृहात आले. त्यानंतर करोनाच्या दुसऱ्या लाटेने पुन्हा सगळे चक्र बंद पाडले. असा एकच मोठा आणि लोकांना चित्रपटगृहापर्यंत आणू शके ल असा चित्रपट प्रदर्शित व्हावा आणि चित्रपटगृहाबाहेर हाऊसफु ल्लचे बोर्ड झळकावेत, ही पाहिली गेलेली स्वप्नं या दिवाळीत प्रत्यक्षात उतरली आहेत. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात लोटलेल्या प्रेक्षकांच्या गर्दीने तिकीटबारीवर कमाईची आतषबाजी सुरू के ली आहे.

अक्षय कु मार आणि कतरिना कैफची मुख्य भूमिका असलेल्या ‘सूर्यवंशी’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात परतणार हा अंदाज सगळ्यांकडूनच वर्तवला गेला होता. त्यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन हे बॉलीवूडच्या दृष्टीनेही प्रतिष्ठेचे आणि महत्त्वाचे ठरले होते. मात्र महाराष्ट्रात खासकरून मुंबई – पुण्यात जिथे देशभरातील एकू ण चित्रपट व्यवसायापैकी ३० ते ४० टक्के  कमाई होते तिथेच चित्रपटगृह सुरू न झाल्याने ‘सूर्यवंशी’चे प्रदर्शन रखडले होते. अखेर राज्य सरकारच्या निर्णयानंतर ही कोंडी फु टली आणि प्रेक्षकांनी चित्रपटासाठी गर्दी के ली. या चित्रपटासाठी देशभरात ४ कोटींची आगाऊ तिकीट विक्री झाली होती. पहिल्याच दिवशी हा चित्रपट २५ ते ३० कोटींची कमाई करेल हाही अंदाज खरा ठरला असून देशभरात ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने २६.२९ कोटींची विक्रमी कमाई के ली आहे. परदेशातील चित्रपटाचा व्यवसाय लक्षात घेतला तर हा एकू ण आकडा ४१ कोटींच्या घरात जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू झालेल्या तिकीटबारीवरच्या या आतषबाजीमुळे ‘सिनेमा पुन्हा परतला’ अशी भावना ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी व्यक्त के ली आहे. महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांतही अर्ध्या क्षमतेत चित्रपटगृहे सुरू असतानाही या चित्रपटाने मिळवलेले यश लक्षणीय ठरले आहे.

‘सूर्यवंशी’ला मिळालेला प्रतिसाद अफलातून असला तरी या एकाच चित्रपटासाठी गर्दी होते आहे असेही नाही. गेल्या महिन्यात चित्रपटगृहे सुरू झाल्यानंतर जे हॉलीवूडपट आणि दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाले आहेत त्यांनाही तिकीटबारीवर चांगले यश मिळाले आहे. मार्व्हलचा ‘द इटर्नल्स’ हा हॉलीवूडपटही ‘सूर्यवंशी’बरोबर प्रदर्शित झाला असून त्यानेही ८.७५ कोटींची कमाई के ली आहे. याशिवाय, आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या ‘नो टाइम टु डाय’ चित्रपटाने २० कोटी, ‘वेनम’ने १५ कोटी, ‘थलायवी’ने ४ कोटी, ‘बेल बॉटम’ ५० कोटी तर मार्व्हलच्याच ‘शांग-ची’ या चित्रपटाने २५ कोटी रुपयांची कमाई के ली आहे. अक्षय कु मारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अगदी निवडक राज्यांतील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित करायची परवानगी मिळाली होती. त्याही परिस्थितीत पहिल्या दिवशी चित्रपटाने ३ कोटी रुपये कमाई के ली होती. त्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आणि महाराष्ट्रात चित्रपटगृहांना परवानगी मिळाल्यानंतर तो पुन्हा चित्रपटगृहातही लावला गेला. आत्तापर्यंत या चित्रपटाने ५० कोटींच्या के लेल्या कमाईनेच खरंतर प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत येण्यासाठी उत्सुक असल्याचे संके त दिले होते. ‘बेल बॉटम’ने धाडस के ल्यानंतर ‘चेहरे’ ,‘थलायवी’ आणि हॉलीवूडपट हळूहळू सातत्याने प्रदर्शित होत गेले. तिकीटबारीवरची कमाई त्यांनी सुरू के ली आणि त्यावर आज प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवंशी’ने कळसाध्याय गाठला आहे. दिवाळीपासून सुरू झालेला चित्रपटांचा हा धूमधडाका आता असाच चालू राहील, हीच आशा सगळ्यांच्या मनात पल्लवित झाली आहे.