scorecardresearch

“या देशात खातात आणि…”, भारतीय क्रिकेटर्सना शिवीगाळ करणाऱ्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ पोलिसात

ल्लोष साजरा करत पाकिस्तानला सपोर्ट करणाऱ्यांवर हिंदुस्तानी भाऊ चांगलाच संतापला आहे.

“या देशात खातात आणि…”, भारतीय क्रिकेटर्सना शिवीगाळ करणाऱ्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ पोलिसात

सोशल मीडियावर कायम चर्चेत असलेल्या हिंदुस्तानी भाऊचा पुन्हा एकदा पारा चढला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवावर आनंद साजरा करणाऱ्यांवर हिंदुस्तानी भाऊ चांगलाच भडकला आहे. एवढच नव्हे तर त्याने सोशल मीडियावरून भारतीय संघाच्या पराभवानंतर आनंद साजरा करत पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या एका व्यक्ती विरोधात खार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केलाय.

T20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागल्यानंतर काहींनी भारताच्या पराभवावर फटाके फोडत जल्लोष साजरा केला. या जल्लोष साजरा करत पाकिस्तानला सपोर्ट करणाऱ्यांवर हिंदुस्तानी भाऊ चांगलाच संतापला आहे. मालवणीमधील हसन कोटी या व्यक्तीने एक व्हिडीओ शेअर करत भारतीय क्रिक्रेटर्सवर टीका केली होती. तसंच त्याचा पाकिस्तानला पाठिंबा असून मुंबई पोलीस आपल्याला काहीही करू शकत नाही असं तो म्हणाला होता. या व्यक्तीविरोधात सगळ्यात आधी हिंदुस्तानी भाऊने पोलिसात गुन्हा दाखल केलाय.

यावेळी संताप व्यक्त करत हिंदुस्तानी भाऊ म्हणाल, “याच देशात खाऊन जर पाकिस्तानचं कौतुक करत असाल तर पाकिस्तानमध्ये जा. या देशात तुमचं काय काम आहे. ही लोकं पाकिस्तानचा विजय झाला म्हणून खूश झाली नसून यांना भारताच्या पराजयाचा जास्त आनंद झाला आहे. अनेक ठिकाणी या लोकांनी फटाके फोडले, मिठाई वाटली. या लोकांना वेळेवर उत्तर देणं गरजेचं आहे.” असं म्हणत भारताच्या पराजयावर आनंद साजरा करणाऱ्यांविरोधात सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्यातं तो म्हणाला.

देशाविरोधात आणि हिंदूविरोधात अपमानजनक वक्तव्य करणाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी यावेळी हिंदुस्तानी भाऊने केलीय. तसंच अशा लोकांना कठोर शिक्षा होणं गरजेचं असल्याचं तो म्हणालाय. देशाविरोधात तसचं हिंदू धर्माविरोधात अपमानजनक वक्तव्य करणाऱ्यांना याआधी देखील हिंदुस्तानी भाऊने सडेतोड उत्तर दिलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या