अभिनेत्री हिना खान आणि अभिनेता शाहीर शेखच्या फॅन्ससाठी एक खुशखबर

‘बारिश बन जाना’या हिट म्युझिक व्हिडीओ नंतर अजुन एका प्रोजेक्टमध्ये काम करणार हिना खान आणि शाहीर शेख.

hina-khan-sha
(Photo-Instagram/Hina Khan)

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री हिना खान आणि अभिनेता शाहीर शेख वेगवेगळ्या कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत असतात. सध्या दोघेही वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करताना दिसत आहेत. ‘बारिश बन जाना’या म्युझिक व्हिडीओद्वारे त्या दोघांनी एकत्र काम केलं. त्यांच्या या व्हिडीओला प्रेक्षकांच भरभरून प्रेम मिळाले आहे. त्यानंतर आता त्यांच्या फॅन्सना पुन्हा एकदा त्या दोघांना एकत्र बघायाचे आहे. आता शाहीर आणि हिना खानच्या फॅन्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच शाहीर आणि हिना पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहे.

हिना खान सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे वेगवेगळे फोटोज आणि व्हिडीओज शेअर करून प्रत्येक अपडेट तिच्या फॅन्ससोबत शेअर करत असते. नुकतंच तिने काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत तिच्यासोबत अभिनेता शाहीर शेख सुद्धा दिसून येतोय. या पोस्ट खाली तिने, “फक्त तुझ्यासाठी Shahin is Back again with bang….”असे कॅप्शन दिले आहे. या फोटोत हिनाने लाल रंगाचा वन-पिस परिधान केला आहे. तसंच शाहीरने पांढऱ्या रंगाचा फॉर्मलं शर्ट आणि पॅन्ट परिधान केली आहे. या फोटोत ते कोणत्या तरी विषयावर संभाषण करताना दिसतं आहेतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by HK (@realhinakhan)

हिनाने हा फोटो शेअर करताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे आता दोघांचे ही फॅन्स त्यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.  या फोटोवरून ते एकत्र काम करत असल्याचे जरी कळतं असले. तरी कोणत्या प्रोजेक्टवर काम करतं आहेतं हे स्पष्टं झालेले नाही.

दरम्यान हिना खान आणि शाहीर शेख यांचा पहिल्या म्युझिक अल्बम ‘बारिश बन जाना’च्या शूटिंग वेळेसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये हिना खान थरथर कापताना दिसून आली होती. फक्त हिना खानच नव्हे तर शाहीर शेखची सुद्धा अवस्था अत्यंत खराब झाल्याचे दिसून आले. दोघांची अवस्था पाहून क्रू मेंबर्स त्यांना ब्लॅंकेटने झाकले असे  दिसून आले. ‘बारिश बन जाना’ या म्युझिक अल्बमच्या यशानंतर हिना आणि शाहीरला पुन्हा एकत्र बघण्यासाठी फॅन्स खुप उत्सुक आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Hit jodi actor shaheer sheikh and actress hina khan back with bang for new project aad