Holi 2019 : बॉलिवूडच्या ‘या’ गाण्यांनी उधळले होळीचे रंग

हिंदी चित्रपटसृष्टीने आपल्याला होळीची अनेक चांगली गाणी दिली आहे

बॉलिवूडच्या गाण्यांनी उधळले होळीचे रंग

होळीच्या दिवशी रंगांसोबत खेळण्याचा आणि चित्रपटातील आपल्या आवडत्या होळीच्या गाण्यांवर थिरकण्याचा मोह कोणालाही आवरत नाही. हिंदी चित्रपटसृष्टीने आपल्याला होळीची अनेक चांगली गाणी दिली आहेत. त्या गाण्यावर होळीमध्ये रंग खेळताना आपले पाय थिरकतात. शोलेपासून ते जॉली एलएलबी चित्रपटांपर्यंत अनेक गाणी होळीवर चित्रीत झाली आहेत. ही गाणी फक्त चर्चेतच नाही राहिली तर सुपरहिट गाण्यांच्या यादीमध्ये देखील सामील झाली आहेत. चला जाणून घेऊया अशाच काही चित्रपट आणि गाण्यांबद्दल…

बद्रीनाथ की दुल्हनिया

बॉलिवूडचा अभिनेता वरुण धवन आणि आलिया भट्ट या जोडीने ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते. तसेच चित्रपटातील बद्री की दुल्हनिया हे होळीच्या पार्श्वभूमी असणारे गाणे नेहा कक्कर आणि अरिजित सिंग यांनी गायले आहे. गाण्यातील आलिया आणि वरुण यांच्या केमिस्ट्रीचा रंग कमालीचा असल्याचे पहायला मिळाले होते. तसेच होळीच्या रंगात रंगलेल्या या जोडीने प्रेक्षकांना वेडही लावले होते.

‘जॉली एलएलबी २’

अक्षय कुमार आणि हुमा कुरेशी यांच्या ‘जॉली एलएलबी’ चित्रपटातील ‘गो पागल..’ हे गाणे प्रेक्षकांना होळीच्या रंगात रंगून टाकणारे आहे. या गाण्यात अक्षय कुमार हुमा कुरेशीसोबत होळी खेळताना दिसत आहे. या गाण्यात दोघांचीही जबरदस्त केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे.

रामलीला

सध्या बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असणारे जोडपे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग ‘रामलीला’ चित्रपटात होळीचे रंग उधळत असल्याचे पहायला मिळाले होते. त्यावेळी या चित्रपटामुळे दीपिका आणि रणवीरच्या नात्याची जोरदार चर्चाही झाली होती. प्रेक्षकांचा या गाण्याना अप्रतिम असा प्रतिसाद मिळाला होता.

ये जवानी है दिवानी

बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. अभिनेता रणबीर कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ‘ये जवानी दिवानी’ चित्रपटातील ‘बलम पिचकारी..’ या गाण्यातील त्यांच्या केमिस्ट्रीने एक वेगळाच रंग भरला होता. चित्रटातील या गाण्याची आजही लोकप्रियता दिसून येते.

मोहब्बते

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि बादशहा शाहरुख खान या जोडीने किती चित्रपटात काम केले यापेक्षा कोणत्या चित्रपटात शाहरुखने अमिताभ यांना रंग लावला हा जर विचार केला तर ‘मोहब्बते’ चित्रपटातील अमिताभ यांचे गुरुकूल आणि शाहरुखने होळी साजरी करण्यासाठी केलेली विनंती तुम्हाला नक्कीच आठवेल. बॉलिवूडमधील होळीचा एक वेगळा रंग या चित्रपटात दिसला होता.

डर

यश चोप्रा निर्मित ‘डर’ या चित्रपटात शाहरुख खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. किरणचे प्रेम मिळविण्यासाठी काहीही करण्यास तयार असणारा राहुल म्हणजेच किरण, सनी देओल आणि जूही चावला होळीच्या रंगात रंगल्याचे पाहायला मिळाले होते.

सिलसिला

अमिताभ बच्चन यांच्या या दमदार चित्रपटानंतर त्यांच्या सिलसिला या चित्रपटातही होळीच्या गाण्याला चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. या चित्रपटात अमितच्या भूमिकेत दिसले अमिताभ आणि चांदणीची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या रेखा यांचा अभिनय जेवढा लोकांच्या लक्षात आहे, अगदी तेवढेच या चित्रपटातील ‘रंग बरसे…’ हे गाणे देखील लोकप्रिय आहे.

शोले

भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेकांच्या पसंतीस उतरलेला आणि आजच्या घडीलाही प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या जय-वीरुच्या ‘शोले’ चित्रपटात होळीचे रंग पाहायला मिळाले होते. नायक अमिताभ बच्चन, धरमेद्र आणि बसंतीच नव्हे तर या चित्रपटातील खलनायक गब्बर सिंग होळीची आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसले होते. ‘कब है होली…’ हा डायलॉग आजच्या घडीलाही चांगलाच प्रसिद्ध आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Holi 2019 the festival of colors became an integral part of bollywood films

ताज्या बातम्या