कलाकारांचं खासगी आयुष्य कधीच कोणापासून लपून राहिलेलं नाही. कलाकार मंडळींचं लग्न, रिलेशनशिप याबाबत अनेक चर्चा रंगताना दिसतात. आताही असाच एक कलाकार त्याच्या खासगी आयुष्यामुळे बराच चर्चेत आला आहे. हॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते अल पचीनो यांच्या रिलेशनशिपबाबत चर्चा सुरू झाली आहे. वयाच्या ८३व्या वर्षी ते चौथ्यांदा वडील होणार आहेत. अल पचीनो यांच्या गर्लफ्रेंडचीही आता बरीच चर्चा रंगत आहे.
नूर अल्फल्लाह ही पचीनो यांची गर्लफ्रेंड आहे. नूर व पचीनो आई-बाबा होण्याचा आनंद सध्या साजरा करत आहे. नूर पचीनो यांच्यापेक्षा ५२ वर्षांनी लहान आहे. नूर आठ महिन्यांची गरोदर आहे. लवकरच ती आनंदाची बातमी देणार आहे. २०२२मध्ये नूर व पचीनो यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना सुरुवात झाली. या दोघांचे एकत्रित डिनर डेटचे फोटो व्हायरल झाले होते.
नूर व पचीनो यांच्यामध्ये करोनाकाळात अधिक जवळीक निर्माण झाली. तिथपासूनच हे दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. पचीनो यांना तीन मुलं आहेत. पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड जन टॅरंट पासून त्यांना ३३ वर्षांची जुली मॅरी नावाची मुलगी आहे. शिवाय त्यांची आणखी एक पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड बेवर्ली डी एंजेलोपासून त्यांना दोन जुळी मुलं आहेत. १९९७ ते २००३ पर्यंत बेवर्ली व पचीनो रिलेशनशिपमध्ये होते.
नूरच्या रिलेशनशिपच्याही याआधी बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. २२व्या वर्षात नूरने ७४ वर्षीय सुप्रसिद्ध गायक मिक जॅगरला डेट केलं होतं. शिवाय ६० वर्षीय निकोलस बर्गग्रेनबरोबरही नूर रिलेशनशिपमध्ये होती. आता नूरचं रिलेशनशिप पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ‘सेंट ऑफ ए वुमन’, ‘हीट’, ‘सर्पिको’, ‘सी ऑफ लव’, ‘द डेविल्स एडवोकेट’, ‘द इनसाइडर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये पचीनो यांनी काम केलं आहे.