हॉलीवूडची एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आणि आंतरराष्ट्रीय सेक्स सिम्बॉल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री Raquel Welch चे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले आहे. अभिनेत्रीच्या मॅनेजरने निधनाची बातमी दिली आहे. ३० चित्रपट आणि ५० टीव्ही मालिकांमधून तब्बल पाच दशकं रकेल वेल्चने हॉलीवूड गाजवलं. १९६० च्या दशकात रकेलच्या प्रतिमेची भुरळ अनेकांना पडली होती. अनेक चित्रपटात तिच्या बिनधास्त बोल्डनेसमुळे जगभरात तिचे चाहते तयार झाले होते. रकेलने हॉलिवूडच्या चित्रपटातील अभिनेत्रीची पारंपरिक प्रतिमा बदलून टाकली होती.

हे वाचा >> टॉपलेस होत रशियन महिलेचा विमानात धिंगाणा; कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न, सिगारेट ओढण्याची मागणी आणि…

drishyam-hollywood-remake
‘दृश्यम’बद्दल मोठी अपडेट समोर; कोरीअन रिमेकनंतर आता चित्रपटाचा बनणार आता हॉलिवूडमध्ये रिमेक
marathi actress Amruta Subhash and sandesh kulkarni Love story Entdc
पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी
Taapsee Pannu reacts on wedding with Mathias Boe
तापसी पन्नू विदेशी बॉयफ्रेंडशी मार्चमध्ये लग्न करणार? अभिनेत्रीने चर्चांवर सोडलं मौन, म्हणाली, “मी कधीही…”
Panchayat Season 2 fame Anchal Tiwari is alive actress shares video after false news
“मी सुरक्षित आहे…”, ‘पंचायत २’ फेम अभिनेत्रीचा मृत्यूच्या व्हायरल बातमीवर खुलासा, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “पूनम पांडेशी…”

१९६० च्या दशकात रकेल वेल्चने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. १९६६ मध्ये तिच्या ‘Fantastic Voyage’ आणि ‘One Million Years B.C.’ या दोन चित्रपटांची चांगलीच चर्चा झाली होती. या दोन्ही चित्रपटात आपल्या बोल्डनेसने तिने खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. १९७३ मध्ये ‘The Three Musketeers’ या चित्रपटासाठी रकेलला खूप नावाजले गेले. हॉलिवूडचा प्रतिष्ठित समजला जाणारा गोल्डन गोल्ब पुरस्कार तिला याच पुरस्कारासाठी मिळाला.

'One Million Years B.C.' या चित्रपटातील एक सीन (photo - reuters)
‘One Million Years B.C.’ या चित्रपटातील एक सीन (photo – reuters)

‘One Million Years B.C.’ या चित्रपटात रकेलने फिगर फ्लाँट करण्याचा ट्रेंड सुरु केला होता. यावरुनच तिला सेक्स सिम्बल आणि सेक्स बॉम्ब अशी टोपण नावं पडली होती. पुढेही तिने अनेक चित्रपटात बोल्ड सीन दिले. चित्रपटाच्या पडद्यावर बोल्डनेसचा तडका देणारी रकेलचं व्यक्तिगत आयुष्य मात्र पूर्णपणे वेगळं होतं. १९६४ मध्ये पतीपासून विभक्त झाल्यानंतर रकेलने एकटीनेच दोन्ही मुलांचा सांभाळ केला. तिच्या मुलाचे नाव डेमेन वेल्च तर मुलीचे नाव टेनी वेल्च आहे.

हे वाचा >> “एखाद्या डॉन प्रमाणे…” ऋता आव्हाड यांचे ठाणे मनपा अधिकाऱ्यावर गंभीर आरोप, म्हणाल्या… “मुख्यमंत्री महोदय आता बस…”

२०१० साली एका पुरस्कार सोहळ्यात वयाच्या ७० व्या वर्षीही रकेलच्या सौंदर्याची जादू कमी झाली नव्हती (Photo - Reuters)
२०१० साली एका पुरस्कार सोहळ्यात वयाच्या ७० व्या वर्षीही रकेलच्या सौंदर्याची जादू कमी झाली नव्हती (Photo – Reuters)

चित्रपटाच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर तिच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये १०० रायफल्स, द प्रिंस अँड द पॉवर, चेअरमन ऑफ द बोर्ड, आणि लिगली बाँड या सिनेमांचा समावेश होतो. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘हाऊ टू बी अ लॅटीन लव्हर’ हा तिचा शेवटचा चित्रपट ठरला.