scorecardresearch

जेम्स बाँड डॅनियल क्रेगची रॉयल नेव्ही कमांडर म्हणून नियुक्ती

डॅनियल क्रेग आपल्या पाचवा चित्रपट जेम्स बाँडच्या ‘नो टाईम टू डाय’च्या रिलीजसाठी उत्सुक आहे.

जेम्स बाँड डॅनियल क्रेगची रॉयल नेव्ही कमांडर म्हणून नियुक्ती
अधिकृत जेम्स बाँड ट्विटर पेजवर रॉयल नेव्ही गणवेशातील डॅनियल क्रेगचा फोटो शेअर करण्यात आला आहे

डॅनियल क्रेग आपल्या पाचवा चित्रपट जेम्स बाँडच्या ‘नो टाईम टू डाय’च्या रिलीजसाठी उत्सुक आहे. दरम्यान त्याने एक विशेष कामगिरी देखील केली आहे. डॅनियल क्रेगची अमेरिकेच्या रॉयल नेव्हीमध्ये मानद कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हा सन्मान मिळाल्यानंतर डॅनियलन यांनी आनंद व्यक्त केला आहे. डॅनियल यांनी या प्रतिष्ठित पदाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेषाधिकार असल्याचे आणि सन्मानीय वाटत असल्याचे त्याने सांगितले.  

डॅनियल क्रेग याचा नो टाइम्स टू डाय हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता डॅनियल क्रेग प्रमुख भूमिकेत दिसेल. दरम्यान, आज (गुरुवार) २३ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले की जेम्स बाँड अभिनेत्याची रॉयल नेव्हीमध्ये मानद कमांडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिकृत जेम्स बाँड ट्विटर पेजवर रॉयल नेव्ही गणवेशातील डॅनियल क्रेगचा फोटो शेअर करण्यात आला आहे. सोबत लिहले आहे की, “डॅनियल क्रेगला रॉयल नेव्हीमध्ये मानद कमांडर बनवण्यात आले आहे. कमांडर क्रेग म्हणाला “वरिष्ठ सेवेत मानद कमांडर पदावर नियुक्त होण्याचा मला खरोखरच विशेषाधिकार आणि सन्मान आहे.”

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-09-2021 at 21:01 IST

संबंधित बातम्या