scorecardresearch

Premium

भगवे वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाची माळ, कपाळावर टिकली; AI ची कमाल अन् हॉलिवूड अभिनेत्रींचा अनोखा अंदाज

‘वाइल्ड ट्रान्स’ या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटोज शेअर करण्यात आले आहेत

Hollywoodactress-look
फोटो : सोशल मीडिया

आर्टिफिशियल इंटेलिजेन्स म्हणजेच एआय (AI) हा शब्द आपल्या सर्वांना परिचयाचा झाला आहे. एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून अलीकडे भन्नाट प्रयोग केले जातात. म्हातारपणी आपण कसे दिसू? ते जगाचा शेवट होईल तेव्हा माणसाचे रूप कसे असेल, अशा सगळ्या प्रकारचे फोटो एआयच्या (AI) माध्यमातून बनवता येतात.

मध्यंतरी एका भारतीय तरुणाने AI च्या सहाय्याने बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींचे म्हातारपणीचे फोटो व्हायरल झाले होते. आता हॉलिवूडच्या अभिनेत्रींचेसुद्धा फोटो व्हायरल होत आहे. फरक फक्त इतकाच आहे की या फोटोजमध्ये या हॉलिवूड अभिनेत्री या भारतीय पोषाखात आणि आध्यात्मिक जीवनात मग्न असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत.

kangana-abu-salem
कंगना रणौत कुख्यात गँगस्टर अबू सालेमसह? व्हायरल होणाऱ्या ‘त्या’ फोटोवर अभिनेत्रीची प्रतिक्रिया चर्चेत
Sukanya troll
“तिने जास्त दारू प्यायली आहे…,” डान्समुळे ट्रोल करणाऱ्याला सुकन्या मोनेंनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाल्या…
parineeti chopra mangalsutra
परिणीती चोप्राचं मंगळसूत्र पाहिलंत का? बहीण प्रियांकाशी आहे खास कनेक्शन
the vaccine war trailer
“सृष्टि से पहले…”, ‘द व्हॅक्सिन वॉर’च्या ट्रेलरमधील पौराणिक श्लोकाने वेधलं लक्ष, १९८८ तील कार्यक्रमाशी आहे कनेक्शन

आणखी वाचा : बॉलिवूड अभिनेत्रींच्या म्हातारपणीचे AI ने तयार केलेले फोटो व्हायरल; दीपिका पदूकोणला पाहून घाबरले नेटकरी

स्कारलेट जॉनसन, एमीलीया क्लार्क, सलमा हायक, नताली पोर्टमॅन, जेनिफर लॉरेन्स, जेनिफर अॅनिस्टन, चार्लीझ थेरॉन, अँजेलिना जोली आणि एम्मा वॉटसन या आघाडीच्या अभिनेत्रींचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. ‘वाइल्ड ट्रान्स’ या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटोज शेअर करण्यात आले आहेत.

या फोटोमध्ये या अभिनेत्रींनी भगव्या रंगाची वस्त्र किंवा साडी परिधान केली आहे, कपाळावर टिकली, हातात बांगड्या, कानात दागिने, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही अभिनेत्री तर आपल्याला संन्याशीच वाटत आहेत. लोकांना ही कल्पकता फारच आवडली असून त्याचं कौतुक केलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Hollywood popular actress in spiritual journey in india ai generated pics viral avn

First published on: 03-06-2023 at 13:10 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×