रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेलं युद्ध अद्याप थांबायचं नाव घेत नाहीये. युक्रेनकडून जगभरातील इतर देशांना मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे. त्यात तिथले अनेक लोक देश सोडून बाहेर पडत आहेत. हॉलिवूड अभिनेता-दिग्दर्शक शॉन पेनने नुकतेच युक्रेनची राजधानी किव्ह येथे रशियाच्या हल्ल्यावरील एक शूट करण्यासाठी गेला होता. त्यानंतर शॉन पेनचे शौर्य जगभरात चर्चेचा विषय ठरला. आता शॉन पेन पोलंडला चालत, पळून जाणाऱ्या हजारो लोकांमध्ये सहभागी झाला आहे.

वयाच्या ६१ व्या वर्षी शॉन पेनने युक्रेनला जाऊन शूट करण्याची हिंम्मत केल्याने त्याचे कौतुक केले जात आहे. पण बिघडलेली परिस्थिती पाहता शॉनही चालतं पोलंडला गेला. ट्विटरवर त्याचा एक फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत तो बॅकपॅक आणि त्याच्या सुटकेससोबत दिसत आहे. त्याच्या बाजुला गाड्यांची लांबच्या लांब रांग आहे.

shilpa shetty at salman khan house
Video: ईडीने मालमत्ता जप्त केल्यावर आईसह ‘या’ अभिनेत्याच्या घरी पोहोचली शिल्पा शेट्टी, व्हिडीओ आला समोर
aai kuthe kay karte fame milind gawali did film with gracy singh
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याने ‘लगान’मधील अभिनेत्रीसह केलंय काम! चित्रपट प्रदर्शित झालाच नाही, शेअर केला व्हिडीओ
Saranya Ponvannan
पार्किंगच्या जागेवरून वाद अन् थेट जीवे मारण्याची धमकी, प्रसिद्ध अभिनेत्रीविरोधात शेजारणीने पोलिसांत दिली तक्रार
ice cream rice
सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

आणखी वाचा : “मला सुद्धा मराठी चित्रपट करायचाय, जर नागराज…”; झुंड पाहिल्यानंतर आमिरने केले वक्तव्य

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

हा फोटो ट्विट करत सीन पेनने म्हणाला, “मी आणि माझे दोन साथीदार कार रस्त्याच्या कडेला सोडून पोलंडच्या सीमेपर्यंत मैल चालत आलो. फोटोमध्ये दिसणार्‍या या सर्व गाड्यांमध्ये फक्त महिला आणि लहान मुले होती आणि कोणतेही सामान नाही.” मात्र, अकादमी पुरस्कार विजेते अभिनेते आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांची गाडी का सोडावी लागली हे या ट्विटमध्ये स्पष्ट दिसून आले आहे.

आणखी वाचा : बॉबी देओलने केले घराणेशाहीवर वक्तव्य; म्हणाला, “तीन वर्ष मी…”

सीन पेनने गुरुवारी किव्ह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित होते. त्याच्या शौर्याबद्दल युक्रेनच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, युक्रेनला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये शॉन पेन यांचाही समावेश आहे. त्याच्या धाडस आणि प्रामाणिकपणाबद्दल आमचा देश कृतज्ञ आहे. शॉन पेनने पंतप्रधान इरिना वेरेश्चुक, पत्रकार आणि लष्करी लोकांची भेट घेतली होती.