अली आणि रिचाच्या लग्नाला हॉलिवूड स्टार्सही लावणार हजेरी; समारंभात पाहुण्यांना फोन वापरता येणार पण... | hollywood stars judi dench gerard butler will attend the wedding of bollywood couple ali fazal and richa chaddha | Loksatta

अली आणि रिचाच्या लग्नाला हॉलिवूड स्टार्सही लावणार हजेरी; समारंभात पाहुण्यांना फोन वापरता येणार पण…

लग्नसमारंभात ‘नो फोन पॉलिसी’बाबत या दोन्ही कलाकारांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अली आणि रिचाच्या लग्नाला हॉलिवूड स्टार्सही लावणार हजेरी; समारंभात पाहुण्यांना फोन वापरता येणार पण…

सध्या बॉलिवूडमध्ये लगीनघाई सुरू आहे. विकी-कतरिना, रणबीर-आलिया यांच्या पाठोपाठ आता अली फजल-रिचा चड्ढा हेदेखील लग्नबंधनात अडकणार आहेत. इतकंच नाही तर येणाऱ्या काळात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणीदेखील लग्नं करणार असल्याची चर्चा आहे. अली आणि रिचा यांच्या लग्नाची तर गेले कित्येक दिवस चर्चा रंगली आहे. दिल्लीतल्या मोठ्या प्रतिष्ठित हॉटेलमध्ये लग्न, हटके पद्धतीने छापलेली लग्नपत्रिका यामुळे अली-रिचा यांच्या या लग्नसोहळ्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

नुकतंच यांच्या लग्नसोहळ्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच अली आणि रिचा हे लग्नाच्या विधीसाठी दिल्लीला रवाना होणार आहेत. लग्नाला फारशी मंडळी त्यांनी बोलवली नसली तरी अली-रिचा यांनी मुंबईमध्ये खास रिसेप्शन सोहळा आयोजित केला आहे. या रिसेप्शनला कोण कोण हजेरी लावणार आहेत याबद्दल माहिती मिळाली आहे. अली फजलचे काही हॉलिवूडमधले मित्रदेखील या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

आणखी वाचा : अभिनेत्री अर्चना पूरण सिंग यांनी व्यक्त केली मनातील खदखद, म्हणाल्या “अजूनही मला तशाच भूमिका…”

‘विक्टोरिया अँड अब्दुल’ या चित्रपटात अलीबरोबर काम करणारी प्रसिद्ध अभिनेत्री जूडी डेंच आणि जेरार्ड बटलर यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. याबरोबरच अलीचा आगामी ‘कंधार’ चित्रपटामधील सहकालकारही या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. याबरोबरक आणखीनही काही हॉलिवूडच्या कलाकारांना आमंत्रण दिलेलं आहे.

३० सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर या दिवसांत वेगवेगळे विधी सोहळे पर पडणार आहेत. आपल्या पाहुण्यांचा विचार करून रिचा आणि अली यांनी ‘नो फोन पॉलिसी’ याला नकार दिला आहे. फक्त सोहळ्यादरम्यान कुणीच त्यांच्या कॅमेराचा वापर करू नये अशी विनंती रिचा आणि अलीकडून करण्यात येणार आहे. फोटो काढणं सोडून पाहुणे त्यांचा फोन वापरू शकतील. अली आणि रिचा एकमेकांना बरीच वर्षं डेट करत होते, आता ६ ऑक्टोबर रोजी हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सिद्धार्थ जाधव प्रवासादरम्यान करतो ‘ही’ गोष्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

संबंधित बातम्या

“मी खरा आहे कारण…” मानसी नाईकच्या नवऱ्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत
“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य
‘काश्मीर फाइल्स’ अप्रतिम सिनेमा, पण प्रोपगंडाच! राजकीय दबावामुळे इफ्फीत समावेश – नदाव लॅपिड
“आपण जे बघतो त्यावर…” मानसी नाईकच्या गंभीर आरोपांवर पतीचे सडेतोड उत्तर
“एवढ्या खालच्या थराला…” मानसी नाईकने सांगितले घटस्फोट घेण्यामागचे कारण

व्हिडिओ

ताज्या बातम्या
Second Hand Car खरेदी करण्याचा विचार करताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर होणार…
एड्सग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ‘ई निरंतर’ सेवा
…अन् ‘ती’ दोन वर्षांनंतर पालकांना भेटली; टाळेबंदीत पश्चिम बंगालमधून हरवलेल्या मुलीची कथा
“काहीतरी काय? हे बाहेर पडले…”, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला दिलं खोचक प्रत्युत्तर!
“…तोपर्यंत भाजपाचा कुठलाही नेता उभ्या महाराष्ट्रात फिरू शकणार नाही”, शिवसेनेचा जाहीर इशारा