“कपडे बदलत असताना ते माझ्या खोलीत आले आणि माझ्या…”; हनी सिंगच्या पत्नीचे सासऱ्यांवर खळबळजनक आरोप

हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने तिच्यावर झालेल्या हिंसाचाराचे तिच्याकडे पुरावे असल्याचा दावा केलाय.

honey-singh-wife-shalini-talwar
(Photo-Instagram@sheenz_t)

बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर हनी सिंग सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. हनी सिंगच्या विरोधात त्याची पत्नी शालिनी तलवारने कौटुंबिक हिंसाचार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केलीय. पती हनी सिंग तसचं सासरच्या मंडळीकडून शारीरिक, शाब्दिक, मानसिक छळासोबतच अत्याचाराला अनेकदा सामोरं जावं लागल्याचं म्हणत शालिनीने हनी सिंगसोबतच सासरच्या अनेकांवर धक्कादायक आरोप केले आहेत.

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायद्यांतर्गत शालिनीने हनी सिंगविरोधात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला असून १० कोटींच्या भरपाईचा दावा केलाय. शालिनीने “मला एखद्या प्राण्यासारखं क्रूरपणे वागणूक देण्यात आली.” असं म्हणत कुटुंबियावर आरोप केले आहेत. शालिनीने दाखल केलेल्या याचिकेत तिने हनी सिंगच्या वडिलांवर म्हणजेच तिच्या सारऱ्यांवर देखील काही धक्कादायक आरोप केले आहेत. ती म्हणाली, “एकदा सासरे दारुच्या नशेत मी कपडे बदलत असताना माझ्या रुममध्ये आले आणि त्यांनी माझ्या छातीवरून हात फिरवला.” असं म्हणाली.  शालिनीने तिच्यावर झालेल्या हिंसाचाराचे तिच्याकडे पुरावे असल्याचा दावा केलाय.

हे देखील वाचा: “जखमा दिसू नयेत म्हणून मी घराबाहेर पडत नव्हते”; अभिनेत्रीने पतीवर केले हिंसाचाराचे आरोप

 

View this post on Instagram

 

A post shared by Shalini (@sheenz_t)

हनी सिंगची पत्नी शालिनी तलवराने गेल्या काही वर्षात तिला पती हनी सिंगने अनेकदा मारहाण केल्याचा दावा केलाय. तसचं सासरच्या कुटुंबाकडून तिला सतत धमकी दिली जात असल्याने ती गेल्या काही वर्षांपासून सतत भीतीखाली जगत असल्याचं ती म्हणालीय. शालिनेने दाखल केलेल्या याचिकेत तिला गेल्या १० वर्षांपासून कश्या प्रकारे हिंसाचाराचा सामना करावा लागला याबद्दल तिने सांगितलं आहे.

तसचं हनी सिंगने इतर अनेक महिलांसोबत अनैतिक संबध ठेवल्याचं ती म्हणालीय. हनी लग्नाची अंगठी न घालता अनेक महिलांसोबत संबध ठेवत होता. शिवाय लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर त्याने मारहाण केली असल्याचं शालिनी म्हणाली.

“मानसिक छळ आणि सततच्या क्रूर वागणूकीमुळे नैराश्याचा सामना करावा लागला होता. यासाठी डॉक्टरांची मदत घ्यावी लागली.” असं शालिनीने वकील संदीप कपूर, अपूर्व पांडे आणि जी जी कश्यप यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत म्हंटलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Honey sing wife shalini talwar allegations on father in law said he walked in may room while she was changing clothes kpw