सोशल नेटवर्कींच्या महाजालात गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींच्या अपघात आणि मृत्यूच्या अफवांचे पेव फुटले आहे. त्यात आता पंजाबचा प्रसिद्ध रॅपर हनी सिंगच्या अपघाताच्या अफवेची भर पडली आहे.
टायगर श्रॉफनंतर यो यो हनी सिंग टि्वटरकरांच्या निशाण्यावर
नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘द एक्सपोज’ चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात एण्ट्री घेणाऱया रॅपर गायक हनी सिंग याच्या कारचा अपघात झाला असून या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी सोशल नेटवर्कींवर फिरत होती. याची माहिती खुद्द हनी सिंगला मिळताच त्याने आपल्या ट्विटर अकाऊंवरून कोणताही अपघात झाला नसून माझ्याबद्दल द्वेष बाळगणाऱया व्यक्तींनी माझ्या अपघाताची अफवा पसरवली आहे. त्यामुळे चाहत्यांनी चिंता करु नये मी एकदम ठीक आहे. असे स्पष्ट केले आहे.



गेल्या काही दिवसांपासून सोशल नेटवर्कींवर हनी सिंग कार अपघातात जखमी झाला असून रुग्णालयात दाखल असल्याचे फेक छायाचित्र फिरत होते. याआधी अशाच प्रकारे गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अभिनेता आयुष्यमान खुराना, हॉलीवूड स्टार ड्वेन जॉनसन द रॉक यांच्या मृत्यूच्याही अफवा सोशल नेटवर्कींवर सुरू होत्या.