भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. युजवेंद्र चहलचा यू-ट्युबर धनश्री वर्मासोबत घरच्या घरी छोटेखानी साखरपुडा सोहळा ८ ऑगस्टला संपन्न झाला. चहल आणि धनश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी दिली. धनश्रीने ही बातमी सोशल मीडियावर सांगितल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यावेळी धनश्री खूपच चर्चेत होती. त्यानंतर सध्या ती पुन्हा एकदा तिच्या भन्नाट डान्समुळे चर्चेचा विषय ठरली आहे.

धनश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात ती तिच्या काही साथीदारांसोबत भन्नाट डान्स करताना दिसते आहे. आजकाल सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ ढिगाने पडतात पण तिने निवडलेलं गाणं हे तितकंच खास आहे. डान्सचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या प्रभुदेवा यांनी कोरियोग्राफ केलेलं मुकाबला हे गाणं आहे. वरूण धवनसारख्या प्रतिभावंत डान्सरने यावर नृत्य केलं आहे. त्याच गाण्यावर धनश्रीने भन्नाट डान्स केला आहे.

 

View this post on Instagram

 

Muqabla… another favourite @varundvn @shraddhakapoor #reels #bollywood

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9) on

तिच्या या डान्सचं फॅन्सकडून प्रचंड कौतुक केलं जात आहे. डान्समध्ये तिने दाखवलेली ऊर्जा अप्रतिम असल्याच्या कमेंट्स त्या व्हिडीओवर आल्या आहेत. तिने पोस्ट केलेल्या या व्हिडीओवर तब्बल ३ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.