मल्याळम सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते मोहनलाल यांचा मुलगा परदेशात लोकांच्या शेतात काम करतोय. मोहनला यांच्या पत्नी सुचित्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रणव मोहनलालला तुम्ही ‘हृदयम’ चित्रपटात पाहिलं असेल. अभिनेता असलेला प्रणव सध्या स्पेनमध्ये असून तिथे तो फक्त अन्न व निवाऱ्याच्या बदल्यात लोकांच्या शेतात काम करतो. त्याच्या सोशल मीडियावर तो प्रवासातले बरेच फोटोही शेअर करत असतो.

सुचित्रा प्रणवला प्रेमाने अप्पू म्हणतात. प्रणव अभिनयाऐवजी अन्न व निवाऱ्याच्या बदल्यात लोकांच्या शेतात काम करतो. “अप्पू आता स्पेनमध्ये शेतात काहीतरी काम करत आहे. त्याला पैसे मिळत नाही, फक्त अन्न व राहायला जागा मिळते. काही वेळा तो लोकांच्या घोड्यांची किंवा इतर प्राण्यांची काळजी घेतो. ही कामं करून तो वेगळे अनुभव घेतो. तो फिरून आल्यावर त्याच्या प्रवासाचे अनुभव, गोष्टी शेअर करतो,” असं सुचित्रा म्हणाल्या.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Raj Thackeray on Maharashtra Election 2024
Raj Thackeray : निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा – Video: प्रसिद्ध दिग्दर्शकाने ४६ व्या वर्षी गुपचूप उरकलं दुसरं लग्न; डॉक्टरशी बांधली लग्नगाठ, व्हिडीओ आला समोर

प्रणवला अभिनयात खूप रस आहे, मात्र तो चित्रपट व भूमिका खूप विचारपूर्वक निवडतो, असं त्याच्या आईने सांगितलं. “मला स्क्रिप्ट्स ऐकायला आवडतात, म्हणून मी बसून ऐकते. तो दर दोन वर्षांनी एक चित्रपट करतो. मी त्याला वर्षातून किमान दोन चित्रपट करायला सांगते. पण जेव्हा मी याबद्दल विचार करते, तेव्हा मला जाणवतं की तो सगळ्या गोष्टी संतुलित करण्याचा प्रयत्न करतो,” असं सुचित्रा म्हणाल्या. प्रणवने वडिलांच्या चित्रपटात काम करावं, अशी आपली इच्छा नाही, कारण त्याने तसं केल्यास लोक तुलना करतील, असं सुचित्रा यांना वाटतं.

हेही वाचा – ४० वर्षांपासून बॉलीवूडमध्ये काम करणारा अभिनेता राहतो भाड्याच्या घरात; म्हणाला, “कोणासाठी घ्यायचं?”

प्रणव मोहनलालचे चित्रपट

प्रणवने २००२ मध्ये आलेल्या त्याच्या वडिलांच्या ‘ओन्नामन’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्याला २००३ मध्ये ‘पुनर्जनी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा केरळ राज्य चित्रपट पुरस्कार देण्यात आला होता. २००५ मध्ये तो तमिळ चित्रपट ‘पापनासम’चा सहायक दिग्दर्शक होता. हा चित्रपट त्याच्या वडिलांच्या मल्याळम चित्रपट ‘दृष्यम’चा रिमेक होता. त्याने ‘लाइफ ऑफ जोसुट्टी’ या मल्याळम चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं होतं.

हेही वाचा – लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर

प्रणव मोहनलालने २०१८ मध्ये मुख्य अभिनेता म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ‘आधी’ हा त्याचा पदार्पणाचा चित्रपट होता. त्यानंतर तो २०२२ मध्ये ‘हृदयम’ मध्ये झळकला. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. त्यानंतर त्याने ‘वर्षांगलक्कु शेषम’मध्ये काम केलं. सध्या प्रणव परदेशात आहे.

Story img Loader