वाढदिवसाच्या शुभेच्छा देत हृतिक रोशनने उडवली कुणाल कपूरची खिल्ली, म्हणाला ‘ही शॉर्ट्स…’

हृतिकची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

hrithik roshan, kunal kapoor, kunal kapoor birthday,

बॉलिवूड अभिनेता कुणाल कपूरचा १८ ऑक्टोबर रोजी वाढदिवस होता. त्याने काही मोजक्याच लोकांसोबत ४४वा वाढदिवस साजरा केला. कुणालने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. वाढदिवशी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान अभिनेता हृतिक रोशनने दिलेल्या शुभेच्छांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हृतिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कुणाल कपूरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये कुणालने काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि पोल्का डॉट्स शॉर्ट्स घातली आहे. तर हृतिकने काळ्या रंगाचा हुडी आणि डेनिम शॉर्ट्स परिधान केले आहेत. या फोटोमध्ये ते दोघे हसताना दिसत आहेत. दरम्यान कुणालने घातलेल्या कपड्यांवरुन हृतिकने त्याची खिल्ली उडवली आहे. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा, नेहमी हसत रहा आनंदी रहा, आणि हो ही शॉर्ट्स कृपया फेकून दे’ या आशयाचे कॅप्शन हृतिकने दिले असून कुणालची खिल्ली उडवली आहे.

असे पहिल्यांदाच झालेले नाही की हृतिकने कुणालची खिल्ली उडवली आहे. गेल्या वर्षी देखील कुणालच्या वाढदिवशी हृतिकने मजेशीर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने एक जुना फोटो शेअर केला होता. या वर्षी देखील हृतिकने कुणालला मजेशीर पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hrithi kroshan wishes kunal kapoor on his birthday in hilarious way see here avb

Next Story
चित्रगीत : सॅक्रेड चॅण्टस ऑफ शक्ती
ताज्या बातम्या